
जळगाव jalgaon
विधान परिषदेच्या (Legislative Council) अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत (election) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) हे विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे महा विकास आघाडीची (Mahavikas Aghadi) ताकद वाढणार असल्याच्या प्रतिक्रिया महा विकास आघाडीच्या जिल्हा नेत्यांनी दिले आहे. तर भाजपाचे (BJP) एकही मत फुटले नसल्याचा (No votes were cast) दावा जिल्हाध्यक्ष आमदार भोळे (District President MLA Bhole) यांनी केला आहे.
खडसेंच्या अनुभवाचा आघाडीला लाभ होणार- विष्णू भंगाळे
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. यातच जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसे हे देखील राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आघाडीला नक्कीच फायदा होईल महा विकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्याने त्यावर चिंतन केले जाईल. राज्यसभे प्रमाणे विधान परिषदेतही मते कशी फुटली याबाबत विचार विमर्श केला जाणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.
भाजपचे पाचही उमेदवार विजय झाल्याचा आनंद - आमदार राजूमामा भोळे
विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासूनच राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीमने मेहनत घेतली. आघाडीतील असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपला सर्वाधिक मतदान झाले आहे. महाविकास आघाडीची मते पुन्हा एकदा फुटली असून भाजपचं एकही मत फुटले नाही. त्यामुळे आमचे पाचही उमेदवार निवडून आले आहे. एकनाथराव खडसे यांना भाजपची मते मिळाली नसल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.
खडसेंना रोखण्यात भाजप अपयशी- ॲड रवींद्र पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथराव खडसे हे दोन्ही नेते विजयी झाले आहेत. नाथाभाऊ विजयी झाल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाल्याने पराभूत ही चिंतेची बाब आहे. तरी नाथाभाऊंना रोखण्यात भाजप सपशेल अपयशी ठरले असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील यांनी सांगितले
पराभव काँग्रेससाठी धक्कादायक- डॉ. उल्हास पाटील
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हांडोरे हे पराभूत झाल्याने मोठा धक्का आहे. ही निवडणूक महा विकास आघाडी म्हणून लढवण्यात आली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्याचे नेते एकनाथराव खडसे हे विजयी झाल्याचा आनंदच आहे. परंतु काँग्रेसच्या उमेदवारांचा संदर्भात जो निकाल आला त्या निकालाविषयी चिंतन केले जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांनी दिली.