भाजपाच्या काही मित्रांकडूनही मिळाली मदत- खडसे

खडसेंच्या विधानपरिषद विजयाचा जळगावात जल्लोष
भाजपाच्या काही मित्रांकडूनही मिळाली मदत- खडसे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) कोटापेक्षा अधिक मतदान झाले. भाजपाच्या काही मित्रांनी मला मतदान (Some BJP friends voted for me) करून मदत केल्याचे नवनिर्वाचित आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले. (Newly elected MLA Eknathrao Khadse)

गेल्या सहा वर्षापासून मी राजकीय विजनवासात (political exile) होतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) विधानपरिषदेत संधी देऊन माझे राजकीय पुनर्वसनच (political rehabilitation) केले आहे. या निवडणूकीत माझा पराभव (defeat) करण्यासाठी भाजपाने (BJP) पूरेपूर प्रयत्न केले होते. मात्र त्यात ते अपयशी ठरले. सहा वर्ष भाजपाने माझा छळ (BJP persecuted me) केला. अनेक चौकशा केल्या तरी हाती काही लागले नाही. मात्र आता मी विधानपरिषदेत राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचे सोने (Gold of opportunity) करीत एकेक विषय मांडणार असल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसेराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथराव खडसे हे विजयी झाल्याने त्यांच्या विजयाचा जळगाव शहरासह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने एकनाथराव खडसे यांचा विधीमंडळ प्रवेश रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र एकनाथराव खडसे हे 29 मत मिळवून विजयी ठरले. खडसेंच्या या विजयाचा जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com