वृत्तपत्रातील बातम्यांचे खडसेंकडून स्वागत, देवकरांची मात्र नाराजी

वार्षिक अहवाल, आर्थिक तोटा, पगारदारांच्या थकबाकीचा विषय गाजला
वृत्तपत्रातील बातम्यांचे खडसेंकडून स्वागत, देवकरांची मात्र नाराजी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Cooperative Bank) वार्षिक सभेचा अहवाल, (Report of the Annual Meeting) आर्थिक वर्षातील तोटा, छपाईसह इतर खर्च याबाबत वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांचे (News by newspapers) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी ‘वृत्तपत्रांकडे आरसा म्हणून बघा’ ('Look at newspapers as a mirror') असे सांगत स्वागत (welcome) केले. मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर (District Bank Chairman Gulabrao Deokar) यांनी वृत्तपत्रांकडून गैरसमज (Misunderstandings from newspapers) पसरवले गेल्याचे विधान करीत नाराजी (displeasure)व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (106th Annual General Meeting) चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बँकेच्या प्रांगणात पार पडली.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, व्हा. चेअरमन शामकांत सोनवणे, संचालक प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, घनश्याम अग्रवाल, मेहतबासिंग नाईक, शैलजा निकम, संजय पवार, जनाबाई महाजन, अ‍ॅड. रवींद्र पाटील, नाना राजमल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, माजी संचालक वाल्मिक पाटील, डॉ. सतीश देवकर हे उपस्थित होते.

पगारदारांना दिलेल्या कर्जांची थकबाकी

जिल्हा बँकेचे सभासद आवटे यांनी सुरवातीलाच वार्षिक अहवाल मिळाला नसल्याची तक्रार चेअरमन गुलाबराव देवकर यांच्याकडे केली. तसेच पगारदार नोकरांना दिलेल्या कर्जाच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. पगारदारांकडे थकबाकी राहिलीच कशी? वसूलीसाठी बँकेने काय प्रयत्न केले? त्यांच्याकडून वसूल होत नसेल तर जिल्हा बँकेच्या एमडींवर जबाबदारी निश्चीत करा अशी मागणी केली.

यावेळी बँकेचे संचालक डॉ. सतीश पाटील यांनी मी देखिल या प्रश्नाशी सहमत असून अशा पगारदारांवर जप्ती आणा असे सांगितले. त्यावर जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख यांनी पगारदारांकडे असलेल्या कर्जाची वसूली करण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू असल्याचे गुळगुळीत उत्तर दिले.

शिंदे गटासह भाजपच्या संचालकांची सभेकडे पाठ

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेला शिंदे गटाचे संचालक आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, अमोल पाटील यांच्यासह भाजपचे आ.संजय सावकारे यांनी वार्षिक सभेकडे पाठ फिरविली. तसेच जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे या देखील अनुपस्थित राहिल्या.

खासगी संस्थांना पतपुरवठ्याचा खडसेंनी मांडला ठराव

जिल्ह्यातील सहकारी संस्थांकडे बँकेची कोट्यावधी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संस्था विक्रीस काढण्यात आल्या आहे. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने ही थकबाकी वसूल होत नाही. तसेच जिल्हा बँकेकडे ठेवींचे प्रमाण वाढत आहे. ही चांगली बाब असली तरी या ठेवींवर व्याज द्यावे लागणार आहे.

बँकेकडे आलेल्या ठेवी द्यायच्या कुणाला ? परतफेड करणारा ग्राहक मिळाला तरच ठेवी गोळा करण्यात अर्थ आहे. अन्यथा ठेवी वाढणे ही देखिल चिंतेची बाब आहे. अशा वेळी खासगी संस्थांना पतपुरवठा केल्यास बँकेला निश्चीतपणे फायदा होईल असा ठराव माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडला. जिल्हा बँकेचे तोटे भरून काढण्यासाठी नवीन पर्याय शोधावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या सेक्रेटरींचे पगार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारने मदत केल्यास छोट्या संस्था वाचतील असे मतही त्यांनी व्यक्त केले. सभेच्या सुरूवातीला 100 टक्के कर्ज वसूली करणार्‍या विविध कार्यकारी संस्थांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. वार्षिक सभेचे प्रास्ताविक एमडी जितेंद्र देशमुख यांनी केले तर आभार संचालक डॉ. सतीश पाटील यांनी मानले.

मंजुरीसाठी नेमले कार्यकर्ते

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत आठ विषयांना मंजूरी देण्यात आली. सभासदांनी प्रश्न विचारण्याआधीच विषय मंजूर करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची टीमच नेमली होती.

वृत्तपत्रांची दखल घेतलीच पाहिजे - आ. खडसे

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री तथा ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्हा बँकेचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मी मंत्री असतांना उपसा जलसिंचन योजनांचे 100 कोटीचे कर्ज माफ केले अन्यथा ही बँक डबघाईस आली असती. वृत्तपत्रे चुका दाखविण्याचे काम करतात. त्यांची दखल घेतलीच पाहिजे. वृत्तपत्रांकडे आरसा म्हणून बघा असे सांगत आमदार एकनाथराव खडसे यांनी वृत्तपत्रातील बातम्यांचे स्वागतच केले.

जिल्हा बँकेला 23 कोटींचा आर्थिक तोटा

जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी बँकेची आर्थिक स्थिती मांडली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेची पीक कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने एनपीएचे प्रमाण 44.95 टक्के आहे. त्यात पीककर्जाच्या एनपीएचे प्रमाण हे 34.41 टक्के असून बँकेला यंदा 23 कोटी 60 लाखांचा निव्वळ तोटा झाला आहे.

बँकेच्या बहुतांश संस्था ह्या अनिष्ट तफावतीत आहेत. ठेवींमध्ये 205 कोटींची वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात थकबाकीची केवळ 15 टक्के वसूली झाली असून बँकेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. जिल्हा बँक सध्या संक्रमण काळातून जात असून बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी सभासदांनी कर्ज भरणा करावा असे आवाहन केले.

बातम्यांविषयी देवकरांनी केले खुलासे

जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर वार्षिक अहवाल पुस्तीका, आर्थिक तोटा, छपाईसह इतर खर्च, शिवरायांसह संत मुक्ताई आणि राष्ट्रपतींचा फोटो वगळणे याविषयी बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या बातम्यांसंदर्भात जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी नाराजी व्यक्त करीत खुलासे केले.

चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या सभासदांना पोस्टाने अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2200 अहवाल सभासदांना न मिळता ते बँकेकडे परत आले. तसेच छपाईचा खर्च कमी करण्यासाठीच यंदा पुस्तीका छापण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेला झालेल्या आर्थिक तोट्याविषयी गैरसमज करण्यात आल्याचे सांगत गुलाबराव देवकर यांनी वृत्तपत्रांविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच वृत्तपत्रांनी बँकेसंदर्भात वस्तुस्थितीची माहिती घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com