विद्यापीठातील ’प्रभारी राज’मुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशी सुरुच

विद्यापीठातील ’प्रभारी राज’मुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशी सुरुच

जळगाव

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी कृती समितीने पुकारलेल्या लेखनी बंद आंदोलनाचा आजचा नववा दिवस असून, प्रभारी कुलगुरू डॉ ई वायूनंदन हे विद्यापीठात येतच नसल्याने विद्यापीठातील कामे खोळंबली आहेत. अनेक फाईल्स डॉ ई वायूनंदन यांच्या सही अभावी प्रलंबित आहेत. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यापीठातील ’प्रभारी राज’मुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशी सुरुच
विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेच्या घोटाळयाची चौकशी करा - विद्यापीठ कृति समितीची मागणी

विद्यापीठात सध्या एकही जबाबदार अधिकारी नसल्याने विद्यापीठाचे प्रशासन वाऱ्यावर आहे. कर्मचाऱ्यांचे आंदोलन शांततेच्या व सनदशीर मार्गाने चालू असतांना विद्यापीठाचे प्रभारी प्र कुलगुरू डॉ बी व्ही पवार यांनाही विद्यापीठाचे आंदोलन सोडवता आलेले नाही. तसेच महामहिम कुलपती तथा राज्यपाल,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण यांना कृतीसमितीने दिनांक 9/10/2021 रोजी ई मेलवर पाठवले अाहे. सदर निवेदनात सध्या विद्यापीठात प्रभारी राज सुरू असून प्रभारी राज आपल्या पदांचा गैरवापर करून विद्यापीठाचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान करीत असल्याने शासनामार्फत तात्काळ प्रशासकाची नियुक्ती करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान आज जळगाव जिल्हा जागृत मंचाचे अध्यक्ष शिवराम पाटील व माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे यांनी विद्यापीठ कर्मच्यांर्याच्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

Related Stories

No stories found.