कार्तिकी पौर्णिमानिमीत्‍त केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दुपारनंतर दर्शनासाठी खुले

कार्तिकी पौर्णिमानिमीत्‍त केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दुपारनंतर दर्शनासाठी खुले

जळगाव jalgaon

येथील निवृत्‍ती नगर (Nivritti Nagar) मधील केरळी महिला ट्रस्टचे (Kerala Mahila Trust) कार्तिक स्वामी मंदीर (Karthik Swamy Temple) दि. ७ रोजी कार्तिकी पौर्णिमेनिमीत्‍त (Kartik Poornima) दु. ४ वा १५ मि. पासून दर्शनासाठी (darshan) खुले करण्यात येणार आहे.

संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पौर्णिमेनिमीत्‍त दर्शनासाठी खुले करण्यात येते.

या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्‍त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. ७ नोव्हें ४ वा १५ मि. कार्तिक पौर्णिमा सुरू होत असून ८ नोव्हें रोजी सायंकाळी ४ वा ३९ मि. पर्यत आहे. 

७ नोव्हें  ४.१५ मी  ते ८ नोव्हें सकाळी ६.४५ मी पर्यंत पौर्णिमा काळात दर्शन घेता येणार असून मंदिर उघडे राहणार आहे. कृतिका नक्षत्र १० नोव्हें रोजी पहाटे ३ वा संपणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

दि. ८ रोजी सकाळी ६.४५ पासून ग्रहण सूरू होत असल्याने मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी सायं ६ वा १८ मि. मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद करण्यात येणार असून. ६ वा १९ मि.ग्रहण समाप्ती नंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे.

पौर्णिमा उत्सव तयारी सूरू

कार्तिक पौर्णिमा उत्सवाच्या तयारीस प्रारंभ झाला असून मंदिर सजावट,भक्‍ताच्या दर्शनाची व्यवस्था आदिची जोमात तयारी सूरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com