तृतीयपंथी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा करीना पायलगुरु यांचे निधन

तृतीयपंथी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा करीना पायलगुरु यांचे निधन
USER

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तृतीयपंथी बहुउद्देशीय संस्थेच्या (third-party multipurpose organization) अध्यक्षा (president) करीना पायलगुरु (Kareena Payalguru,) (वय 37, रा.चौघुले प्लॉट) यांचे शनिवारी पहाटे 4.15 वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died of a heart attack) झाले.

चौघुले प्लॉट परिसरातील जुना ममुराबाद नाक्यासमोर वास्तव्याला असलेल्या करीना पायलगुरु यांना करीना दीदी म्हणूनच संबोधले जात होते. इमरान खान इस्माईल खान असे त्यांचे नाव होते. शनिवारी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास राहत्या घरात त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. घराजवळ राहणारे चेतन गुप्ता यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. करीना दीदी यांचा जळगावात मोठा परिचय असल्याने नागरिकांनी घरी गर्दी केली आहे. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शिवाजीनगर स्मशानभूमी समोर असलेल्या कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील अमजद खान,भाऊ इस्माईल खान व पुतण्या साहिल आदी परिवार आहे.

गवळी बांधवांच्या सगर उत्सवात शुक्रवारी केले नृत्य

करिना दीदी यांनी शुक्रवारी रात्री गवळी बांधवांच्या सगर उत्सवात त्यांनी नृत्य देखील केले होते. बनावट तृतियपंथीयांकडून नागरिकांना दिल्या जाणार्‍या त्रासाला पायबंद घालण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी अलीकडेच त्यांनी तृतीयपंथी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली होती. तृतीयपंथीयांना आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकाचा दर्जा मिळवून देणे, तृतीयपंथीयांना स्वतंत्र दफनविधीसाठी जागा उपलब्ध करुन देणे, बीपीएल कार्ड, घरकुलाचा लाभ तसेच तृतीयलिंग मानून भारतीय राज्य घटना व कायद्यानुसार हक्क बहाल करणे आदी न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com