रावेर मालधक्क्यावरून मोठ्या खंडानंतर धावणार ‘कानपूर रॅॅक’

केळी उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा; उद्या खा.रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत रवाना होणार पहिला रॅॅक
रावेर मालधक्क्यावरून मोठ्या खंडानंतर धावणार ‘कानपूर रॅॅक’

रावेर Raver । प्रातिनिधी-

रावेर केळीचे आगार (Banana Depot) म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून दिल्ली आझादपूर आणि कानपूरसाठी सातत्याने होणारी केळी निर्यात (Banana exports) 10 वर्षाआधी बंद पडली होती. गजबज असलेले मालधक्के(Maldhakke) यानंतर ओसाड पडले. केळी भावांची (Banana prices) देखील धूळधाण झाल्याने, बोर्डवरील भाव व प्रत्यक्षात मिळणारे भाव यात मोठी तफावत असल्याने उत्पादकांच्या पदरी खूप निराशा आल्या, आता मात्र कानपूर रॅॅकच्या ('Kanpur Rack) निमित्ताने उत्पादकांना काही अंशी दिलासा मिळू शकतो.10 वर्षा आधी बंद पडलेली कानपूर लोडिंग दि.26 मार्च पासून सुरु होत असल्याने, रावेर फळबागातयदार (Orchardist) पूर्वसंध्येला याबाबत नियोजन करत आहे.रावेर मालधक्यावरून शनिवारी कानपूरसाठी पहिला रॅॅॅॅक रवाना होत असल्याने,केळी उत्पादकांमध्ये (banana grower) यामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी खा.रक्षा खडसे देखील उपस्थित राहणार आहे.

9 वर्षापासून रेल्वेने उत्तर प्रदेशात होणारी केळी निर्यात (Banana exports) बंद पडलेली होती, गेल्या वर्षी दि.4 एप्रिल 2021 रोजी खंडित झालेली वाहतूक किसान रॅॅकच्या (Kisan Rack) माध्यमातून सुरु झाली. केळी बाजारात (banana market) आलेली मरगळ व उदासीनता यामुळे दूर झाली.दि.4 एप्रिल पासून आता मार्च 2022 पर्यंत तब्बल 100 रॅॅक दिल्लीला पोहचले आहे.यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा राहिला.रेल्वेमुळे केळी बागेमध्ये कापणीलायक साचणारी केळी कमी होवू लागल्याने, भावांमध्ये मोठी घसरण टळली होती.

निसर्गाचा प्रकोप आणि कोरोनाचे संकट यामुळे मोठा फटका उत्पादकांना दोन वर्षात बसला, त्यामुळे बाजारपेठेत प्रचंड मंदी आलेली होती, आता जनजीवन पूर्वपदावर पोहचले आहे.यात आणखी भर म्हणजे कानपूर रॅॅक ('Kanpur Rack) सुरु होत असल्याने, रावेर तालुक्यातील केळी बेल्ट मध्ये शेतकर्‍यामध्ये (farmer) आनंद आहे. दि.26 रोजी रावेर मालधक्यावरून पहिला कानपूर रॅॅक रवाना होत आहे. 24 व्हीपीयु डब्बे लोडिंग केले जाणार आहे.

10 वर्षाच्या खंडानंतर होणारी वाहतूक केळी उत्पादकांसाठी (banana grower) दिलासाजनक आहे. तर पुन्हा ओसाड झालेला मालधक्का मजुरांच्या गर्दीने फुलणार आहे. हा रॅॅॅॅक रवाना होतांना खुद्द खा.रक्षा खडसे (Kha. Raksha Khadse)उपस्थित राहणार आहे. त्यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वा.हिरवी झेंडी दाखवून हा आनंद साजरा केला जाणार आहे.

यासाठी पूर्वसंध्येला माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी यांच्या निवासस्थानी रावेर फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील,उपाध्यक्ष किशोर गनवाणी, सचिव अ‍ॅॅड रवींद्र पाटील यांचे नियोजन सुरु होते.

रेल्वेला 6 कोटींचे उत्पन्न

वाढलेले डीझेलचे भाव यामुळे ट्रक भाड्यात वाढ झाल्याने, त्याचा परिणाम केळी भावांवर पडत होता. यामुळे पर्याय शोधतांना पदरी निराशाच येत होत्या. गतवर्षी खा.रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याने रावेरहून किसान रॅॅक (Kanpur Rack) सुरु झाला. दि.4 एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यत 100 रॅॅक रावेरहून दिलीच्या आझादपूर मार्केटमध्ये पाठवण्यात आले.यातून तब्बल 6 कोटीचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे.रेल्वे भाड्यात (Railway fares) या उपक्रमात 50 टक्के सूट मिळत असल्याने शेतकर्‍यांना त्याचा मोठा फायदा झाला.

10 वर्षांनंतर कानपूर रॅॅक जाणार गेल्यावर्षी किसान रॅॅकच्या माध्यमातून दिल्लीसाठी वॅॅगन रवाना झाल्या,बघता बघता 100 वॅॅगन वर्षात रावेरहून सुटल्या,यामुळे शेतकरी व व्यापारी यांना वाहतुकीचा खर्च खूप कमी झाल्याने फायदा झाला. दिल्लीसाठी वर्षभराआधी लोडिंग सुरु झाली होती.कानपूर लोडिंग बंदच होती, दि.26 रोजी पहिला रॅॅक कानपूर जात आहे.यामुळे नक्की शेतकर्यांना लाभ होईल, यासाठी खा.रक्षा खडसे यांनी खूप सहकार्य केल्याने,रावेरहून वाहतूक होवू शकली आहे. त्यांच्या उपस्थितीत आजचा रॅॅक रवाना होणार आहे.

- रामदास पाटील, अध्यक्ष रावेर फळबागायतदार युनियन, रावेर

Related Stories

No stories found.