दुरुस्ती अपूर्ण असताना कन्नड घाट
 वाहतुकीसाठी सुरु करण्याचा अट्टहास

दुरुस्ती अपूर्ण असताना कन्नड घाट वाहतुकीसाठी सुरु करण्याचा अट्टहास

सलग दुसर्‍या दिवशी घाटात वाहतुकीची कोंडी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

कन्नड घाटात (Kannada Ghat) अतिवृष्टीमुळे (Heavy rain) अडीच महिन्यापुर्वी दरडी कोसळून (patient collapsed) रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले होते. रस्ता खचल्यामुळे घाटातील रहदारी बंद (Traffic closed) करण्यात आली होती. घाटाची अद्याप दुरुस्ती सुरु (Repair started) असून घाटाच्या दुरुस्ती काम पूर्णपणे झालेले नाही. तरी देखील केवळ महामार्गाचा दिवसाचा लांखो रुपयाचा टोल बुडतो आहे, म्हणून मंगळवारी (दि.९) घाट अवजड वाहतुकीसाठी खुला (Open to heavy traffic) करण्यात आल्याची गोपनिय माहिती मिळाली आहे. परंतू घाट सुरु झाल्यापासून घाटात वाहतुकीचा खोळंबा (Traffic congestion) होत असून तासोंतास वाहनधारकांना मनस्ताप सहन कराव लागत आहे. तसेच संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण असल्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन, संबंधीत विभानाने घाटाच्या दुरुस्तीबाबत खातर जमा करुनच वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी गौताळा अभयारण्यात अतिवृष्टीचा पाऊस कोसळल्यानंतर अभयारण्यात असलेला कन्नड-चाळीसगांव रस्ता बहूतांश ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्याने तर घाटातील रस्ते खचल्याने धोकादायक ठरल्यानंतर तो बंद करण्यात येवून घाटातील रस्त्याच्या कामांना घाई-घाईत गती देण्यात आली. या काळात चाळीसगांव ते कन्नड हा घाटातील रस्ता अवजड व मोठ्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. घाटातील रस्ते पूर्णपणे घाई-घाईत तयार झाले असले तरी ठिकठिकाणी असलेल्या टप्यातील संरक्षक भिंतीचे काम अद्यापही सुरु आहे.

सद्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झालेला आहे. आणि साखर कारखान्यासाठी चाळीसगांवमार्गे ऊस सुरळलीत व्हावी, तसेच अवजड व मोठ्या वाहनाचा लांखो रुपयांचा टोल बुडत असल्याने, यासाठी मंत्रीमहोदयांकडे लॉबीग करुन हा घाट घाईत सुरु करण्यासाठी ठेेकेदारास भाग पाडल्याची चर्चा आहे. तसेच या रस्त्यांवरील पेट्रोलपंप चालकाकडून देखील घाट लवकर सुरु करण्यसाठी शर्यतीप्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

काल कन्नड घाट वाहतूकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आल्यानंतर गुजरातकडून मराठवाड्याकडे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक, वाळुची वाहतूक सुरु झालीच शिवाय ऊसाचीही वाहने मोठ्या प्रमाणावर या मार्गावरुन जावू लागली असतांनाच ऊस हा बैलगाड्यांच्या माध्यमातूनही कन्नडकडे नेण्याची वाहतूक सुरु झाली आणि ऊस घाटातून चढवून नेण्यासाठी मुक्या जनावरांची ओढाताण आणि मोठ्या वाहनांना त्यातून येणारे अडथळे यातून काल घाटातील रस्ता सुरु झाल्यानंतर आज दुसर्‍याच दिवशी घाट पूर्णपणे जाम झाला असल्याचे चित्र दिसून आले.

त्यातच घाटातील संरक्षक भिंतीचे अपूर्ण कामास देखील पून्हा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे घाटाची पूर्णपणे दुरुस्तीनतंर घाट वाहतुकीसाठी सुरु करावी अशी मागणी होती आहे. यासंबंधी ठेकेदार राज पुन्शी यांच्याकडून माहिती घेतली असता, घाटच्या रस्त्याची दुरुस्ती झाली असून सरंक्षण भितीचे काम अद्याप अपूर्ण असून ते सुरु आहे. परंतू आम्हाल घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत संबंधीत विभागाने पत्र दिल्याचे ते म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.