चोपडा पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना पाटील

चोपडा पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना पाटील

चोपडा Chopada ( प्रतिनिधी )
येथील पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सभापदीपदी (Chairman) धानोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) कल्पना दिनेश पाटील (Kalpana Patil) यांची बिनविरोध निवड (Unopposed selection) झाली तर उपसभापतीपदी (Deputy Speaker) राष्ट्रवादीचे सुर्यकांत गोविंदा खैरनार (NCP's Suryakant Govinda Khairnar) यांची सहा मतांनी निवड घोषित करण्यात आली.त्यानंतर भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी बहिष्कार टाकून सभागृह सोडले.या निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या सहकार्याने राष्ट्रवादीच्या सभापती तर शिवसेनेच्या पाठींब्याने उपसभापतीपद देखील राष्ट्रवादीला मिळाले.

पंचायत समितीच्या १२ सदस्यांपैकी ११ सदस्य हजर होते.तर भाजपचे अकुलखेडा येथील सदस्य रामसिंग पवार गैरहजर होते.पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गावित होते.

चोपडा पंचायत समितीच्या सभागृहात दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली.सभापतीपदासाठी धानोरा येथील राष्ट्रवादी च्या सदस्या कल्पना दिनेश पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.मात्र उपसभापती पदासाठी भरत विठ्ठल बाविस्कर,पल्लवी वना भिल व सुर्यकांत गोविंदा खैरनार या तिघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.त्यापैकी पल्लवी वना भिल यांनी माघार घेतली.उपसभापतीपदाच्या निवडणुकीत हात उंचावून मतदान प्रक्रिया सुरू होण्या आधीच भाजपचे सदस्य आत्माराम गोरख म्हाळके, प्रतिभा बापूराव पाटील,भरत विठ्ठल बाविस्कर, भुषण मधुकर भिल अशा चौघांनी निवड प्रक्रिये वर बहिष्कार टाकून सभागृह सोडले.यावेळी मतदान प्रक्रिया सुरू असतांना सदस्यांना बाहेर जाता येणार नाही अशी सुचना पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावित यांनी केली.

त्यानंतर देखील भाजपचे चारही पंचायत समिती सदस्य सभागृहाच्या बाहेर गेले.पंचायत समितीत एकूण १२ सदस्य आहेत.त्यापैकी निवड सभेला ११ सदस्य उपस्थित होते.तर भाजपचे पंचायत समिती सदस्य रामसिंग अमरसिंग पवार अनुपस्थित होते.त्यातील भाजपचे चार सदस्य सभागृहा बाहेर गेल्याने उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या अमिनाबी रज्जाक तडवी,पल्लवी वना भिल,कल्पनाबाई यशवंत पाटील,मालुबाई गोविंदा कोळी,सुर्यकांत गोविंदा खैरनार व शिवसेनेचे मच्छिन्द्रनाथ वासुदेव पाटील अशा सहा सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.यावेळी पिठासन अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावित यांनी उपसभापदी राष्ट्रवादीचे सुर्यकांत गोविंदा खैरनार ११ पैकी सहा मतांनी निवडून आल्याचे घोषित केले.

भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीच्या कल्पना दिनेश पाटील सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या.तर सेनेच्या मदतीने राष्ट्रवादीचेच पारगाव येथील सुर्यकांत गोविंदा खैरनार हे सहा मतांनी निवडून आले.परंतू उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्याने अंतिम क्षणी भाजप चे भरत बाविस्कर यांचा पराभव झाला.मात्र पडद्यामागून घडलेल्या राजकीय घडामोडींची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com