भरदिवसा साडेसहा लाखांचे दागिने लंपास

Crime news
Crime news

चाळीसगाव । प्रतिनिधी chalisgaon

शहरातील कोतकर कॉलेज जवळील आर डी टॉवर् जवळील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 6 लाख 28 हजारांचे दागिने भरदिवसा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार 18 रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकिशोर रामेश्वर शर्मा (वय 68) हे दि.18 रोजी ते दुपारी अडीच वाजता चाळीसगाव शहरातील साजन कलेक्शन या ठिकाणी साड्या घेण्यासाठी गेले होते. परत घरी आल्यावर त्यांना दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसून आले. आत जाऊन पाहिले असता कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचा प्रकार लक्षात आला. यात एकूण 6 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबीला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.निरीक्षक योगेश माळी करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com