रेल्वे प्रवासात लांबविले 22 लाखाचे दागिने

पाचोरा ते चाळीसगाव दरम्यानची घटना; एकाला अटक
रेल्वे प्रवासात लांबविले 22 लाखाचे दागिने

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

पाऊस सुरु असल्याने खिडकी बंद करण्याचा बहाणा (excuse to close the window) करीत हातचालाखी (Manually) करुन कुरीयरवाल्याकडील (courier) 22 लाखांचे दागिने (22 lakhs jewelery) व 52 हजार रुपयांची रोख रक्कम लांबविल्याची (Cash extended) घटना हावडा-मुंबईल मेलमध्ये (Howrah-Mumbai Mail) पाचोरा ते चाळीसगाव स्टेशनदरम्यान दि. 8 रोजी घडली. रोकड लांबविणार्‍या प्रवाशांच्या मदतीने आरपीएफने एकाच्या मुसक्या आवळल्या असून दुसरा दागिने व रोकड घेवून पसार झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील हरिश्चंद्र खंडू वरखेडे (वय-64) हे वास्तव्यास असून ते कुरीयर डिलेव्हरीचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. कुरीयरसह ते सराफांनी दिलेले दागिने देखील संबंधितांकडे पोहचविण्याचे काम करतात. दि. 7 रोजी त्यांनी जळगाव येथून 12180 अप हावडा-मुंबई मेलचे आरक्षण केले होते. त्यांना एस-6 बोगीतील 33 क्रमांकाचे सीट आरक्षित झाले होते. या दिवशी हावडा मेल तीन तास उशिराने धावत असल्याने दि. 8 रोजी मध्यरात्री ही गाडी जळगाव स्टेशनवर आली. यावेळी वरखेडे हे त्यांच्याकडे असलेले 21 लाख 91 हजारांचे 422.81 ग्रॅम सोने व 52 हजार 400 रुपये असलेली बॅग घेवून ते आरक्षीत असलेल्या सीटवर बसले.

बॅग लंपास होताच केली आरडाओरड

सोबतचे प्रवाशी बॅग घेवून गेल्याचे समजताच हरिश्चंद्र वरखेडे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी ते शौचालयाजवळ असलेल्या इतर प्रवाशांकडे बॅगेबाबत विचारणा केली. मात्र कोणती व कशाची बॅग असे म्हणत त्यांनी वरखेडे यांना सांगितले. त्यावेळी वरखेडे यांनी आरपीएफ कर्मचार्‍यांना हा प्रकार सांगितला.

पोलिसांनी रेल्वेतील शौचालयात तपासणी केली असता यावेळी त्यांना शौचालयात बॅग मिळून आली. परंतु त्यात दागिने व रोकड नसल्याचे दिसले. दम्यान, भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी टाक याला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार मुद्देमाल घेवून पसार झाला असून एमआयडीसी व लोहमार्ग पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

गाडी हळू होताच साथीदाराचे पलायन

आरपीएफच्या कर्मचार्‍यांसह प्रवशांनी बॅग लांबविणार्‍याचा साथीदार सतविरसिंग बलवंतसिंग टाक (वय-19, रा. तांबापूरा) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने चाळीसगाव येण्याआधीच गाडी हळू झाल्यावर त्याचा साथीदार रहीम उर्फ बावल्या रशीद खान (रा. तांबापूरा) हा बॅग घेवून गेल्याचे सांगितले.

हातचालाखी करीत घेवून गेला बॅग

पाचोरा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर पाऊसाचा जोर वाढल्यामुळे वरखेडे यांनी त्यांच्या समोरील सीटवर बसलेल्या प्रवाशाला खिडकी बंद करण्याबाबत सांगितले. त्या प्रवाशाने खिडकी बंद करण्याचा बहाणा करीत हातचालाखी करुन हरिश्चंद्र यांच्याकडील बँग घेवून तो शौचालयाच्या दिशेने पळाला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com