जेडीसीसी बँकेचे कुलुप तोडले

बँक शाखा लुटण्याचा प्रयत्न फसला
जेडीसीसी बँकेचे कुलुप तोडले

शेळावे ता.पारोळा - वार्ताहर parola

शेळावे बु ॥ (ता.पारोळा) येथे दि.१ ऑक्टोबर २०२२ च्या मध्यरात्रीच्या सुमारास अंधारात चोरांनी जेडीसीसी बँक शाखेचे दोघे कुलुप तोडून बँक (Bank) लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कडुन बँकेचे लॉकर (Bank lockers) उघडले गेले नाही म्हणुन त्यांना तेथून खाली हात परतावे लागले.

गावात गेल्या आठवडाभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरूच असून ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बँक लुटीचा प्रयत्न केल्याने चोरट्यांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. सदर बँकेचे कुलुप तोडुन खाली पडलेले दिसल्यावर बँकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर अधीकार पारधी यांनी चौकात येवुन ही घटना सर्वांना सांगितली. त्यानंतर पारोळा पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व एपीआय डोमाळे, एपीआय राजू जाधव, पो.कॉं.किशोर भोई, पो.कॉं.अभिजीत पाटील, पोलीस पाटील सुकलाल पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटील, दै.देशदूतचे महेंद्र सांगळे, शिवदास पारधी, रावण पाटील आदी उपस्थित होते.

डॉग स्कॉट निलेश झोपे, डॉग जंजीर व जमादार दर्शन बोरसे यांनी डॉगने जिल्हा परीषद शाळा शेळावे बु. रस्ता दाखवला तसेच पो.निरीक्षक वाकोडे यांनी शेळावे बुद्रुक/खुर्द येथील ग्राम संरक्षक पथक स्थापन करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले व त्यांना मार्गदर्शन केले.

जेडीसीसी बँकेचे कुलुप तोडले
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com