सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनास जयंतराव पाटील यांची भेट

सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनास जयंतराव पाटील यांची भेट

जळगाव - jalgaon

बकालेच्या अटकेसाठी सकल मराठा समाज जळगाव जिल्हा आज एकत्र आला असुन जिल्हाधिकारी कार्यालया (Collector's Office) समोर आज या साखळी उपोषणाचा ४ था दिवस आहे या साखळी उपोषण आंदोलनाला आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayantrao Patil) यांनी या साखळी उपोषण स्थळी भेट देऊन यावर चर्चा केली तसेच या बकालेच्या अटकेसाठी व बडतर्फी करिता शासनाकडे पाठपुरावा करतो असे सांगितले आणि व या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला.

तसेच जळगाव (jalgaon) शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. बेताल बकाले हा गेल्या ३० दिवसापासून फरार असून त्याला आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये.त्यासाठी प्रशासनाच्या विरुद्ध आज विविध समाज व संघटनांनी प्रत्यक्ष भेट व पाठिंबा दर्शविला.

या साखळी उपोषणाला बहुसंख्य संख्येने उपोषणाला बसले आहेत.या बेताल बकालेला अटक होण्यासाठी व सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी सदर सकाळी उपोषणाला सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेले आहे.

जोपर्यंत त्याला बडतर्फ व अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहणार आहे. त्यानंतर सदर प्रशासनाने त्यास लवकरात लवकर अटक व बडतर्फ न केल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज आत्मदहन करणार व जळगाव जिल्हा स्तरावरील मोठ्या मोर्चाचे आयोजन लवकरच करेल व पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com