
जळगाव : jalgaon
जिल्हा परिषदेसमोर जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील ( Former Speaker Janardhan Patil) आणि राष्ट्रवादीचे सुरज नारखेडे (Suraj Narkhede of NCP) यांच्यात जि.प.च्या सेसमधील काम वाटपावरून दि.१६ डिसेंबर संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास हमरी-तुमरी होऊन शाब्दिक खडाजंगी (verbal spat) झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर मोठी गर्दी जमा झाली होती.
जळगाव पंचायत समिती सेसमधील निधीच्या कामात टेंडर का? भरले म्हणून माजी सभापती ललिता पाटील यांचे पती जनार्दन पाटील यांनी सुरज नारखेडे यांना विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक कलगिरीतुरा रंगला. दोघांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ यांच्या दालनात दाखल होत काम पंचायत समितीच्या सेसेची की जि.प.च्या सेसचे याबाबत विचारणा केली.
मात्र त्याबाबत स्पष्टता झाल्यानंतर काही काळात दोघांमधील वाद शमला. शुक्रवारी काम वाटप समितीची बैठक होती. यापूर्वीच दुपारी काम वाटपावरून सुरज नारखेडे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठिय्या मांडला होता. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी जि.प.प्रशासनावर केला होता.