जळकेच्या ग्रा.पं. सदस्याची आत्महत्या

जळकेच्या ग्रा.पं. सदस्याची आत्महत्या

जळगाव । Jalgaon

तालुक्यातील जळके येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भगवान ब्राह्मणे (वय-36, ह. मु. जळगाव) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली महिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथिल ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ब्राम्हणे हे सध्या जळगावात वास्तव्यास असून ते शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हनुन नोकरी करीत होते. सायंकाळी जळगाव येथून राजेंद्र हे थेट भगवान पाटील यांच्या शेतात गेले, याठिकाणी त्यांनी शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संजय चिमणकारे व प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली त्यानुसार म्हसावद पोलीस दुरक्षेत्राचे स्वप्निल पाटील व प्रदीप पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com