
जळगाव : Jalgaon
महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन बुध्दीबळ निवड चाचणीत स्पर्धेत १० वर्षाखालील वयोगटात जळगांवच्या तसीन रफिक तडवी याने ९ पैकी ८.५ मिळवित स्पर्धेत अपराजित रहात उपविजेतेपद पटकावले.
अखिल भारतीय बुध्दीबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी तसीन महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा २८ ते ३० जुन दरम्यान ऑनलाईन होणार आहे. त्यातून भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेत विक्रमी एकूण ६१८ खेळाडूंचा सहभाग होता. तसीन हा आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू असून त्याला जळगावचे प्रशिक्षक प्रशांत कासार यांचे मार्गदर्शन मिळत आहे . तसीन च्या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष अतूल जैन,सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे .