जळगावकरांनो सावधान... विना मास्क फिराल तर..

दंडात्मक कारवाईला सामोरे जाल
जळगावकरांनो सावधान... विना मास्क फिराल तर..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronary obstruction) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे, असे असतांनाही नागरिक बेफिकीरीचे दर्शन घडवित असून कुठल्याही प्रकारे नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. अशा बेफिकीर नागरिकांवर (Citizen indifference) कारवाईसाठी पोलीस (Police) मंगळवारी रस्त्यावर उतरले. जळगाव शहरातील फुले मार्केट, टॉवर चौकासह विविध भागात मुख्याचौकात विना मास्क (without a mask) फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई (Punitive action) करण्यात आली.

नव्याने आढळून येणार्‍या कोरोनाच्या रुग्णांमध्य कमालीची वाढ झाली आहे. रुग्णांनी शंभरीचा आकडाही पार केला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र यानंतरही नागरिकांकडून कुठल्याच पध्दतीने नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.

अशा नागरिकांवर कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी रस्त्यावर उतरले. दिवसभरात टॉवर चौक, फुले मार्केट परिसरात कारवाईची मोहिम राबविण्यात आली. यात 21 जणांवर कारवाई करण्यात येवून प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे 4 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात फिरायचे असेल कोरोनाचे नियमांचे पालन करा मास्क वापरा, अन्यथा कारवाई होणार असा इशाराही पोलिसांनी दिला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com