
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव रनर्स ग्रुप (Jalgaon Runners Group) आयोजित खान्देश रनमध्ये (Khandesh Run) देशभरातील 3000 धावपटूंसह (3000 runners) जळगावकरांनी सहभाग (Jalgaonkar participated) नोंदवून सागर पार्क येथे खान्देश रन (Khandesh Run) मोठ्या उत्साहात (excitement) पार पडला. यात 10 किलोमीटर वयोगट 18 ते 40 पुरुष गटातून 34 मिनिटे 31 सेकंदात दिनेश वसावे प्रथम तर महिला गटात 40 मिनिटे 38 सेकंदात आरती पावराने बाजी मारली.
खान्देश रनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूकांचे काव्यरत्नावली चौक जळगाव येथे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पुष्पवृष्टी करून स्वागत करून प्रोत्साहित केले.
अशोक जैन यांच्या हस्ते मॅरेथॉन रनला हिरवी झेंडी
खान्देश रनच्या 6 व्या मॅरेथॉनची पहाटे 5.30 वाजता सुरुवात झाली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश चोरडिया यांनी 21 कि.मी. मॅरेथॉन रनला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकूमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रा.डी.डी.बच्छाव, मनोज शिंदे, मनोज अडवाणी, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक मॅरेथॉन रनच्या धावपटूंचा उत्साह वाढविला.
गटानुसार विजयी स्पर्धक
10 किलोमीटर वयोगट 18 ते 40 पुरुष गटातून दिनेश वसावे प्रथम तर किरण बिचारे द्वितीय तर महेंद्र राजपूतने तृतीय क्रमांक पटकाविला. 10 किलोमीटर वयोगट 18 ते 40 महिला गटात प्रथम क्रमांक आरती अर्जुन पावरा तर द्वितीय उज्वला वासुदेव बारी तर प्रिया अशोक पोटोळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. 10 किलोमीटर वयोगट 41 ते 99 पुरुष गटात प्रथम विलास डोईफोडे तर द्वितीय नागोराव भोयर आणि तृतीय भीमराव औताडे, 41 ते 99 महिला गटात प्रथम शोभा यादव 53 मिनिटे 26 सेकंद तर द्वितीय क्रमांक दीपा स्वामी 68 मिनटे 42 सेकंद तर 70 मिनिटे 47 सेकंदात डॉ. जयश्री राणे तृतीय क्रमांक पटकाविला.
जैन इरिगेशनचे 1 हजार सहकारी धावले
जळगाव रनर्स ग्रृपच्या पुढाकाराने आयोजित खान्देश रन महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकार्यांनी सहभाग घेतला. यातील अनेकांनी 3, 5, 10, 21 कि.मी. मॅरेथॉन रन यशस्वीपणे पूर्ण केली. हजारो धावपटूंमधून 10 कि.मी. पुरूष गटात जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी महेंद्र राजपूत तृतीय क्रमांकाने विजेता ठरला. तसेच वयस्क वयोगटात टाकरखेडा येथील सुरक्षा विभागातील सहकारी भीमराव अवताडे यांनी 10 कि.मी.मध्ये द्वितीय क्रमांकाने विजेते ठरले. त्यांना खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, सन्मानचिन्ह यासह पाच हजाराचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.