जळगाव ते दिल्ली राष्ट्रपती भवन सायकल यात्रा

जळगाव ते दिल्ली राष्ट्रपती भवन सायकल यात्रा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

संविधान साक्षरता अभियान (Constitution Literacy Campaign) अंतर्गत जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ता मुकेश कुरील (Social worker Mukesh Kuril) हे 5 नोव्हेंबर रोजी जळगाव रेल्वे स्टेशनजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सायकलद्वारे जळगाव (Jalgaon) ते दिल्ली राष्ट्रपती भवनापर्यंतच्या (Delhi Rashtrapati Bhavan) प्रवासाच्या अभियानास आरंभ (Start the campaign) केला.

या अभियानाचे उद्देश हे सर्व सामान्यांना संविधानाची ओळख करून देणे तसेच सर्व सामान्य व्यक्तींद्वारा संविधानाचे वाचन व स्वत: जीवनात संविधानाद्वारे मिळालेल्या कर्तव्याचे व अधिकाराचे पालन करणे असे आहे. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त या अभियानाद्वारे महामहिम राष्ट्रपती यांना संविधानाची प्रत भेट देणे तसेच संपूर्ण भारतात सर्व शासकीय कार्यालय, विद्यालये, बस स्थानके आदी सार्वजनिक ठिकाणी संविधानाची प्रत प्रथमदर्शनी ठेवणे तसेच सामान्य नागरिकांद्वारे त्याचे वाचन होणे व संविधान आत्मसात करणे याबाबतचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

एकूण प्रवास हा सुमारे 1700 कि.मी.असून जळगांव, बु-हाणपुर, खंडवा, इंदौर, आष्टा, भोपाल, विधीशा, सागर, हिरापुर, छतरपुर, महोबा, हरीमपुर, कानपुर, लखनऊ, सितापुर, शहाजहापुर, बरेली, मुरादाबाद, हापुर, गाजियाबाद व दिल्ली असा आहे. सरासरी 90 ते 100 कि.मी.रोजचा प्रवास हा सायकलद्वारे असून या प्रवासा दरम्यान नागरीकांना भेटून त्यांना संविधानाच्या प्रती अर्पित करणे व संविधानाच्या वाचनाबाबत प्रचार प्रसार करणे असा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com