टेनिस क्रिकेट स्पर्धेत जळगांवचा संघ विजेता

टेनिस क्रिकेट स्पर्धेत जळगांवचा संघ विजेता
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत मुलींच्या प्रथम व मुलांच्या द्वितीय क्रमांक पटकविलेल्या जळगांव संघासोबत मिनाक्षी गिरी, अ‍ॅड.राहूल वाकलकर ,आकाश धनगर

जळगांव jalgaon

महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन (Maharashtra State Tennis Cricket Association) आयोजित नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट (tennis cricket) अजिंक्यपद स्पर्धेत (Junior state level championships) जळगांवच्या मुलींच्या संघाने (girls' team) प्रथम क्रमांक ( finished first) व मुलांच्या संघाने (children's team ) द्वितीय क्रमांक (finished second) पटकावला.

मुलींच्या कर्णधार शरयू बाविस्कर यांच्या नेतृत्वात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संघाचे खेळाडू कामिनी पाटील,कार्तिकी चौधरी, सुविता साळुंखे,पूजा पाटील,विशाखा पाटील,एकता दहाळ,श्वेता अहिरे,शिल्पा पाटील,जानवी पाटील,प्राजक्ता चौधरी यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. वूमन ऑफ द सिरीज कार्तिकी चौधरी ठरली. जळगांवच्या संघाने उस्मानाबाद संघावर विजय मिळवून विजेते पद पटकावले.

मुलांचा संघाने कर्णधार महेश पाटील यांच्या नेतृत्वात द्वितीय क्रमांक पटकावला. संघाचे खेळाडू आयुष पाटील, लोकेश पाटील, जितेंद्र पावरा, पवन पाटील, मयूर पाटील, रोहन धनगर, दिपक जाधव, अनिल मोहिते, हितेश पाटील, मनीष चौधरी, वैभव दहाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. बेस्ट बॉलर ऑफ द सिरिज पवन पाटील ठरला. विजयी खेळाडूंना क्रीडाशिक्षक अरविंद जाधव, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धा २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२२ रोजी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झाल्या. जळगांव जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर, डॉ.अभिषेक पाटील, आकाश धनगर, अनिल बाविस्कर, राहुल पाटील, प्रतीक शुक्ला, उमेश हंडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन महासचिव मिनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेकनिकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com