8 व्या राज्यस्तरीय स्टुडंट ओलंपिक स्पर्धेत जळगावच्या संघाने केली 11 गोल्ड, 14 सिल्व्हर, 6 ब्रॉझ मेडलची लयलूट

 8 व्या राज्यस्तरीय स्टुडंट ओलंपिक स्पर्धेत जळगावच्या संघाने  केली 11 गोल्ड, 14 सिल्व्हर, 6  ब्रॉझ मेडलची लयलूट

यावल Yaval ( प्रतिनिधी )

सोलापूर (Solapur) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय (state level) 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन (student olympics) स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने (Jalgaon team) चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगावच्या संघाने केली 11 गोल्ड, 14 सिल्व्हर, 6 ब्रॉझ मेडलची लयलूट (Loot of medals) करत जळगावचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावले आहे.

जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले.

स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते.

त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा), तुषार पाटील यांना सिल्व्हर मेडल (धरणगाव), गौरव पाटील गोल्ड मेडल (अमळनेर), बॅडमिंटन स्पर्धेत वरून महाजन यांना गोल्ड मेडल (अमळनेर). कुस्ती स्पर्धेत पै.प्रतीक पाटील यांना सिल्व्हर मेडल ( अमळनेर), पै.महेश वाघ यांना 57 किलो गटात गोल्ड मेडल (धरणगाव), पै.अमोल महाजन यांना 60 किलो गटात गोल्ड मेडल ( धरणगाव), पै.भावेश कोळी यांना 51 किलो गटात सिल्व्हर आणि 55 किलो गटात गोल्ड मेडल(धरणगाव), पै.राजेंद्र माळी 51 किलो गटात ब्राँझ मेडल (धरणगाव).

आर्चरी स्पर्धेत अंडर 17 गटात घनश्याम मराठे यांना गोल्ड मेडल (चोपडा), कमिश बारेला यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), दीपक पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा) तसेच अंडर 19 गटात शिवाजी वाघ यांना गोल्ड मेडल (चोपडा), जयेश पाटील यांना सिल्व्हर मेडल (चोपडा), चेतन पाटील यांना ब्राँझ मेडल (चोपडा), अंडर 25 गटात चेतन पाटील यांना गोल्ड मेडल (चोपडा).

ॲथलेटीक्स स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातील चौगाव ता.चोपडा येथील विशाल पारधी (5 किमी.धावणे, गोल्ड मेडल), शुभम पाटील (100 मी. धावणे, सिल्व्हर व 200 मी. धावणे, ब्राँझ मेडल), वासुदेव कोळी (10 किमी.धावणे, ब्राँझ मेडल) उमेश धनगर (3000मी. धावणे, सिल्व्हर मेडल), मारवड ता.अमळनेर येथील कुंदन शिरसाठ (ब्राँझ मेडल) मिळाले असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी दिली.

जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे कोच पवन पाटील सर (चोपडा), पै.संदीप कंखरे सर (धरणगाव) यांचे मार्गदर्शन लाभले.स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा टीमच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com