जळगावकरांची प्रतिक्षा संपणार : शिवाजीनगर उड्डाणपूल महिनाअखेरीस होणार खुला

मनपा आयुक्तांनी केली पाहणी
 जळगावकरांची प्रतिक्षा संपणार : शिवाजीनगर उड्डाणपूल महिनाअखेरीस होणार खुला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवाजीनगर उड्डाण पुलाचे (Shivajinagar flyover) काम अंतीम टप्प्यात (work in final stage)आले असून, महिनाअखेरीस नागरिकांसाठी खुला (Open to the public) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचा आढावा (Review of work) घेण्यासाठी मनपा आयुक्तांसह (Municipal Commissioner) अधिकारी व नगरसेवकांनी (Officers and corporators) शिवाजीनगर उड्डाण पुलाची गुरुवारी सकाळी पाहणी (Survey) केली.

शिवाजीनगर उड्डाण पुलाचे (Shivajinagar flyover) काम अंतीम टप्प्यात (work in final stage) आले आहे. त्यामुळे पुलालगतचा जोडरस्ता पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या गटारी त्याबरोबरच चेंबर्सची पाहणी करण्यात आली.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नूतन शहर अभियंता एम.जी.गिरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री.राऊत यांच्यासह माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, नवनाथ दारकुंडे, शाखा अभियंता नरेंद्र जावळे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, मनिष अमृतकर उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या पाहणीनंतर तहसील कार्यालयाजवळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर पिंप्राळा कुंभारवाडा परिसरातील पुलाच्या बांधकामाची पाहणी करुन आढावा घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com