
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव शहरात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीमार्फत (Maharashtra State Electricity Distribution Company) महापारेषणचे (fMahapareshan) 132 केव्ही उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीचे कामे (Maintenance and repair works) करण्यासाठी दि.20 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार असल्याने दि.20 मे रोजी होणारा पाणी पुरवठा (Water supply) बंद राहील. त्यामुळे जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक (Postpone a day) दिवस पुढे ढकलण्यांत येत आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाने (Municipal Water Supply Department) केले आहे.
जळगाव शहरात दि.20 मे रोजीचा पाणी पुरवठा बंद असल्याने दुसर्या दिवशी दि.21 मे रोजी खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग,पिंप्राळा हुडको आदी परिसरात करण्यात येईल. तसेच दि.21 मे रोजी व 22 मे रोजीचा पाणीपुरवठा अनुक्रमे दि. 22 मे रोजी नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनिपेठ परिसर आदी भागात करण्यात येणार आहे. तसेच 23 मे रोजी वाल्मिकनगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड परिसर आदी भागात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊन नये, म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी केले आहे.
21 रोजी होणारा पाणीपुरवठा
खंडेराव नगर दुसरा दिवस- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर. पिंप्राळा टाकी, मानराज टाकीतून दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग. खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्ती नगर, कल्याणी नगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजा नगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंद टाकी दुसरा दिवस ... नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समता नगर परिसरातील उर्वरित भाग, डीएसपी बायपास तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर, डि.एस.पी. टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, मोहन नगर, तिवारी नगर, बाहेती शाळा, गिरणाटाकी आवारातील टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, मेहरुण भागातील राहिलेला परिसर, मेहरुण गावटाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर दुसरा दिवस...सदगुरुनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर.
22 रोजी होणारा पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीराम पेठ, नवी पेठ, हौसिंग सोसा. शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीतून खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड संपूर्ण, भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग... जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकार नगर, जोशीपेठ, हेमु कलाणी टाकी परिसर... गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी परिसर, डीएसपी टाकी- साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवराम नगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरि भाग, श्रध्दा कॉलनी, नंदनवन नगर, चर्च रोड, 15 इंची व्हॉल- प्रभात कॉलनी, ब्रुक बॉण्ड कॉलनी, वाघनगर, हरीविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग, नित्यानंद टाकी... समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर आदी.
23 रोजी होणारा पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचन नगर, दिनकर नगर, आसोदा रोड, नित्यानंद टाकी परिसर, मोहन नगर, नेहरुनगर परिसर, खंडेराव नगर परिसर, हरीविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्री नगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराज टाकीवरील भाग दांडेकरनगर, मानराजपार्क असावा नगर, निर्सग कॉलनी, खोटेनगर टाकीवरील भाग द्रौपदी नगर, मुक्ताईनर, धनश्री नगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वर नगर, हिरा पाईप, शकरराव नगर, खेंडीगाव परिसर, डीएसपी टाकी- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर, शिवकॉलनी, विद्यूत कॉली, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग, अयोध्या नगर पहिला दिवस गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा., जगवानी नगर, मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर परिसर आदी.