
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कोरोनाच्या विषाणुच्या Corona virus प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी लसीचे दोन डोस घेण्याचा केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार लसीकरण Vaccination मोहीम राबविण्यात येत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला असला तरी ओमायक्रॉन Omycron या विषाणुने पुन्हा आपण डोके वर काढले आहे. ओमायक्रॉनसह कोरोना विषाणुच्या नियंत्रणासाठी लसीचे दोन्ही डोस Both doses of the vaccine न घेतल्यास ग्राहकांना customers पेट्रोल Petrol देवू नये किंवा प्रतिष्ठानांमध्ये प्रवेश देवू नये Don't give up असा फतवा महापालिका उपायुक्त शाम गोसावी Deputy Commissioner Sham Gosavi यांनी गुरुवारी काढला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. आरोग्य विभागाच्या उपाययोजनेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला आहे. मात्र राज्यात ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळून आल्याने राज्यात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना किंवा ओमायक्रॉन विषाणुच्या नियंत्रणासाठी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात आले आहे. लसीकरण न झालेल्या नागरिकांना पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल देवू नये असे आदेश महापालिका उपायुक्त शाम गोसावी यांनी दिले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड
बाजारपेठेत किंवा पेट्रोलपंपावर येणार्या सर्व ग्राहकांचे प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही डोस घेतल्याबाबत लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी. त्यासाठी स्वतंत्र कर्मचार्याची नेमणूक करावी. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोलपंप चालकांविरोधात किंवा प्रतिष्ठांनाविरोधात 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे की नाही, यासाठी महापालिका प्रशासनातर्फे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.