पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव - jalgaon

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि.28 सप्टेंबरला सकाळी 10 वा. नूतन मराठा महाविद्यालय (nutan maratha college) सभागृह, कोर्ट रोड, जळगाव येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय (Pandit Dindayal Upadhyay) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!

मेळाव्यासाठी खासगी आस्थापनांनी 316 रिक्तपदांची मागणी नोंदवली आहे. या रिक्तपदांसाठी 12 वी पास, आयटीआय, पदविकाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या 6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नूतन मराठा महाविद्यालयाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो आदींसह मेळाव्यास उपस्थित रहावे. विभागाचे संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in यावर नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी त्वरित नाव नोंदणी करावी.

ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध सुविधांचा आणि माहितीचा देखील उमेदवारांना लाभ घेता येतो, असेही त्यांनी कळवले आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज...!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com