तरुणाची ९२ हजार ९१९ रुपयांत ऑनलाईन फसवणूक

तालुका पोलिसात गुन्हा दाखल
तरुणाची ९२ हजार ९१९ रुपयांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव - Jalgaon

फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे भासवून एकाने जळगाव शहरातील खोटेनगर येथील मोहन निंबाजी गुंजाळ वय ३८ या तरुणाची (Online) ऑनलाईन ९२ हजार ९१९ रुपयात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खोटेनगर येथील मोहन गुंजाळ या तरुणाचे हायवे दर्शन कॉलनी येथे विकास दुधाचे दुधू विक्रीचे दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी मोहन दुकानावर असतांना त्याला अनोळखी व्यक्तीचा फोन आला. यावर संबंधितांना मोहन यास फोन पे कंपनीतून बोलत असून तुमचा शेवटचा व्यवहार कधी झाला आहे, याबाबत माहिती विचारली. त्यानंतर तुमचे शेवटच्या व्यवहाराचे एक हजार रुपये हे फोन पे कंपनीकडे अडकलेले आहेत. ते तुम्हाला परत तुमच्या खात्यावर जमा करुन देतो असे सांगितले.

अशाच पध्दतीने विश्‍वास संपादन करुन संबंधिताने मोहन याच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसव्दारे एक लिंक पाठविली. व ओटीपी विचारला. अशाप्रकारे तीनवेळा मेसेज करुन लिंक पाठविली व ओटीपी विचारला. मोहन याने संबधितावर विश्‍वास ठेवून आलेले ओटीपी सांगितले. यानंतर सायंकाळी मोहन यास मोबाईलवर त्याच्या बँक खात्यातून ९२ हजार ९१९ रुपये दुसर्‍याच खात्यात वर्ग झाल्याचे मेसेज प्राप्त झाले. बँकेत जावूनही मोहन याने खात्री केली. फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे भासवून अनोळखी इसमाने फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर मोहन गुंजाळ याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शुक्रवार रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सतीश हाळनोर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.