जळगाव मनपात भुखंड भुसंपादनाचा अजब कारभार !

जळगाव शहर महानगरपालिका
जळगाव शहर महानगरपालिकाjalgaon municipal corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उद्यानासाठी (park) महापालिकेने (municipal corporation)खुला भुखंड (Open space) तीन ठिकाणी मोफत मिळत असतांना त्या जागांजवळ 4 कोटी रुपये खर्च करून भुखंड खरेदी केल्याचा अजब कारभार समोर आला आहे. याबाबत नागरिकांच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी केली असल्याचा आरोप आयुक्तांकडे तक्रारीतून केले आहे.

शहरातील रामानंगरच्या उजव्या बाजूला शंभर फुटी रोडालगत तसेच आशाबाबा नगर येथे असलेल्या आरएसएमएस कॉलनी शेजारी 155 गटात तीन जागा महापालिकेन 2019 मध्ये टीडीआर देवून एकही रुपया न देता भुसंपादन केल्या आहे. परंतू या जागांवर उद्यान तयार करण्याचे काम मनपाने केले नाही.

परंतू 2022 मध्ये मनपाने शहरापासून दुर व रेल्वे लाईन लगत असलेली गट नं 125 मध्ये 4 कोटी 30 लाख रुपये देवून जागा खरेदी केली आहे. आता ही जागा बगिच्यासाठी उपयोगात आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अतुल मुंदडा यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असून नागरिकांच्या पैशांचा गैरवापर करून कोणाच्या फायद्यासाठी हे पैशांचा वापर केला जात आहे. संबधीत अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहीजे. हे भुसंपादन त्वरीत रद्द करा अशी मागणी मुंदडा यांनी आयुक्तांकडे केली आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com