जळगाव महापालिकेत भाजपाला दणका ; चार नगरसेवक अपात्र

मंत्री गिरीश महाजन समर्थकांचा समावेश, घरकुल घोटाळ्यात झाली होती शिक्षा
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - jalgaon

महापालिकेतील (Municipal Corporation) भारतीय जनता पार्टीच्या (bjp) तसेच मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांचे समर्थक चार नगरसेवक अपात्र करण्याचा निर्णय जळगाव जिल्हा न्यायालयाने दाखल याचिकेवर दिला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला मोठा राजकीय दणका बसल्याचे चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे.

जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्ह्या न्यायालयात घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होती. याप्रकरणी जिल्ह्या न्यालयाचाने आज १३ एप्रिल रोजी निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्तेकडून ॲड.सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले.

न्यायदेवतेवर विश्वास होताच

विविध कारणांमुळे जळगाव महानगरपालिकेतील पाच नगरसेवकांविरुद्ध जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी दाद मागितली होती. न्यायदेवतेवर प्रचंड विश्वास असल्यामुळे आज न्यायालयाने निकाल दिला आहे. पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती असल्यामुळे इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगतभाई बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. घरकुल घोटाळ्यामध्ये न्यायालयाने नगरसेवकांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली होती त्यामुळे ते नगरसेवक राहण्यास अपात्र होते. आता न्यायालयात अपात्र झाल्याने इतर नगरसेवकांना देखील यातून बोध मिळेल.

- प्रशांत नाईक, फिर्यादी तथा नगरसेवक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com