जळगावच्या माहेरवाशिनीची नाशिकच्या सासरी आत्महत्या

पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
जळगावच्या माहेरवाशिनीची नाशिकच्या सासरी
 आत्महत्या

जळगाव jalgaon

शहरातील शनिपेठ परीसरातील माहेर व नाशिक येथील सासर असलेल्या विवाहितेने (married) सासरच्या जाचाला (Tired of father-in-law's scrutiny) कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केली. ही घटना 27 जानेवारी रोजी घडली. विवाहितेस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोमल सुरेश देवरे असे मयत विवाहितेचे नाव आहे.

कोमलची आई मंगलाबाई सुरेश देवरे यांनी फिर्याद दिल्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात कोमलचा पती अभिजीत राजेंद्र बेलगावकर, सासू भारती, जेठ आकाश, जेठाणी मेघा, दिर अमित यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण, वहिनी, मुलगा असा परीवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com