ग.स.सोसायटीच्या सभेत राडा ; गोंधळाची परंपरा कायम

ग.स.सोसायटीच्या सभेत राडा ; गोंधळाची परंपरा कायम

जळगाव - jalgaon

आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या ग.स.सोसायटीची (Government Servants) वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील (Uday Patil) यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या (Nutan Maratha College) मल्टीपर्पज हॉलमध्ये सुरु झाली.

ग.स.सोसायटीच्या सभेत राडा ; गोंधळाची परंपरा कायम
Video ग. स. सोसायटीच्या वार्षिक सभेत दांगडो

या सभेत पटलावरील विषय वाचन सुरु असताना उदय पाटील यांच्या हातून विषय पत्रिका एका सभासदाने स्टेजजवळ येत हिसकावून घेतली त्यानंतर काही सभासद स्टेजवर आल्यानंतर सत्ताधारी व सभासदांमध्ये राडा झाला.

त्यामुळे एकच गोंधळ उडाला. खाली बसलेले सभासदांमधून ५० खोके,एकदम ओके, ५० नाही २० खोके तिन्ही गट ओके, अशी नारेबाजी केल्याने सत्ताधारी व सभासदांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरु असताना काही सभासद स्टेजवर चढून आले. त्यामुळे एका सभासदांची कॉलर पकडल्याने त्यात गोंधळाची अधिकच भर पडली. त्यामुळे ग.स.सोसायटीच्या सभेला गोंधळाची परंपरा कायम राहिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com