गणरायाच्या विसर्जनाची तयारी

गणरायाच्या विसर्जनाची तयारी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गणरायाला निरोप देण्याची सर्व तयारी महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे.

शहरात ठिकठिकाणी 25 ते 30 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ, जैन फाउंडेशन, युवाशक्ती संस्थांसह इतर सामाजिक संस्थांचेही योगदान लाभत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ते बदल करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

यंदाचा गणेशोत्सवाचा आनंद शहरासह राज्याभरात कोणालाही मनाप्रमाणे घेता आला नाही, 22 रोजी शनिवारी गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते तेव्हापासूनच गणेशोत्सवावर पाउस व कोरोनाचे सावट होते.

काव्यरत्नावली चौकात मोठे केंद्र

मनपा व स्वयंसेवी संस्थांतर्फे शहरात ठिकठिकाणी मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले आहे यात सर्वात मोठे केंद्र हे काव्यरत्नावली चौकात असणार आहे. कांताई फौंडेशन, युवा शक्ती फौंडेशन यांचे यात मोठे योगदान आहे. स्वत: जिल्हाधिकारी हे या केंद्रावर मूर्ती अर्पण करणार आहेत, ट्रक, ट्रॅक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

15 बाय 45 फूट रुंदीचा वॉटरप्रुफ पंडाल मूर्ती संकलनासाठी उभारण्यात आला आहे. येे युवाशक्तीचे 50 स्वयंसेवक, मनपाचे 10 स्वच्छता कर्मचारी, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे 15 कर्मचारी व अधिकारी येथे सेवा बजावतील. तरी नागरिकांनी या चौकातील केंद्रात मूर्ती व निर्माल्य आणावे असे आवाहन युवा शक्ती फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीराज कावडीया यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशात्सवावर कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध घालण्यात आहे आहेत. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीस बंदी असल्यामुळे वाजत गाजत मिरवणूक काढू नये तसेच मेहरुण तलावावर कुणीही गर्दी न करता ठिकठिकाणी नेमलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती आणून ठेवाव्यात व निर्माल्य दान करावे महानगरपालिकेस सहकार्य करावे.

सतीश कुलकर्णी, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव

गणेशभक्तांच्या आनंदावर वीरजण

यंदाच्या गणेशोत्सावर पाउस आणि कोरोनाचे सावट होते. गणरायांचे आगमन झाल्यापासूनच पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे.

सतत पावसामुळे व कोरोनामुळे लॉकडाउन असल्यामुळे अनेक बंधने लादलेली होती. त्यामुळे देखावे, आरास उभारण्यास तसेच वाद्य वाजविण्यास, मंदिरे खुली करण्यावर व मूर्ती विसर्जनासाठी कुठलीही मिरवणूक न काढता व मेहरुण तलावापयर्र्त गणेश मंडळांसह नागरिकांना पोहोचण्यार बंदी घालण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या या बदलामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर मात्र वीरजण पडले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com