पिंप्राळयात संगणकावर खेळल्या जाणार्‍या जुगार अड्डयावर छापा

रामानंदनगर पोलिसांची कारवाई ; २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंप्राळयात संगणकावर खेळल्या जाणार्‍या जुगार अड्डयावर छापा

जळगाव - Jalgaon

शहराच्या पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमधे संगणकावर फन टार्गेट गेम या नावाने खेळल्या जाणा-या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमध्ये आनंद शिंदे यांच्या दुकानात सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंंता यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप परदेशी, संदीप महाजन, हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळतांना स्वप्निल शिंदे याच्यासह मेहमुद कमरोद्दीन पिंजारी (मास्टर कॉलनी अशोक किराणाजवळ जळगाव), प्रविण प्रभाकर पाटील (गर्जना चौक पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (गणपती नगर पिंप्राळा) यांना ताब्यात घेतले आहे. सिपीयु, मॉनीटर, स्पिकर, माऊस आदी साहित्य, रोख ८७० रुपये असा एकुण २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फन टार्गेट या नावाने हा जुगार खेळला जात होता. हा गेम खेळण्यासाठी ० ते ९ असे आकडे लिहिलेले बॅनर वापरले जाते. त्य बॅनरवर सट्टा खेळणारे ग्राहक त्यांचा मोबाईल ठेवतात.सट्टा चालक माऊस व की बोर्डचा वापर करुन संगणकावर जुगार चालवतात. ज्या ग्राहकाचा क्रमांक लागतो त्याला बक्षीसरुपाने पैसे दिले जातात असाअशा पध्दतीने हा जुगाराचा खेळ खेळला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com