जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

30 सप्टेंबर 2022 अखेर तिमाही व अर्धवार्षिक काळातील निकाल
जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने (Jain Irrigation Systems) आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही व अर्धवर्षाचे एकल व एकत्रित निकाल जळगाव येथे 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन (Anil Jain) यांनी कंपनीच्या आर्थिक स्थिती व निकालांबाबत सुसंवाद साधला.

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चा सन्मान

आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्धवर्षातील एकत्रित उत्पन्न 3650.4 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 3422.1 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 228.3 कोटी रुपयांनी जास्त आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 435.5 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 496.6 होता म्हणजे 61.1 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेला. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीचे एकल उत्पन्न 1607.6 कोटी रुपये आहे तर गत आर्थिक वर्षात 1644.6 कोटी रुपये होते जे ह्या वर्षी 37 कोटी रुपयांनी कमी आहे. कर, व्याज आणि घसारापूर्व नफा पाहिला तर 166.1 कोटी रुपये आहे, गत आर्थिक वर्षात तो 232.8 होता म्हणजे 66.7 कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षात तो कमी नोंदविला गेलेला दिसतो आहे

“आम्हाला आर्थिक वर्ष 2022-23 मधील दुसरी तिमाही आणि अर्धवार्षिकाचे लेखा परीक्षणा पूर्वीचे आर्थिक निकाल जाहीर करताना आनंद होत आहे. आव्हानात्मक जागतिक परिस्थिती असली तरी कंपनीची दुसरी तिमाहीचे एकत्रित उत्पन्न 1610 कोटी रूपये (कर, व्याज आणि घसारापूर्व नफा मार्जिन 10.3 टक्के) लवचिक योजनेनुसार राहिले. पहिल्या सहामाहीत एकत्रित उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 3650 कोटी रुपयांवर पोहोचले. कर व्याज घसारा पूर्व मार्जिन 10.3 टक्के राहिला. पाॅलीमरच्या किंमतीमधील अस्थिरतेमुळे मार्जिनवर विपरीत परिणाम झाला. हा परिणाम हंगामी आणि क्षणिक आहे कारण आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीत उत्पन्नाचे प्रमाण शंभरात 60 असे असते व पहिल्या सहामाहीत ते आर्थिक वर्ष 2022-23 दुसऱ्या सहामाहीत 40 असते. वाढत्या ऑर्डर्समुळे आणि स्थिर खर्च पूर्ण वर्षाच्या बेसिसवर उत्तम तऱ्हेने शोषले गेल्यामुळे मार्जिनमध्ये लवकरच सुधारणा होईल. अलीकडील महिन्यात पॉलीमरच्या किंमतीत सुधारणा झाल्यामुळे आमची उत्पादने ग्राहकांना रास्त दरात मिळतील. तिमाहीत कंपनीने कंत्राटाचा दरातील 2067.5 कोटी रूपयांचा करार 'जल जीवन मिशन' खाली मिळविला आहे. मार्जिनमध्ये आणि रोख प्रवाह (Cash Flow – कॅश फ्लो) यामध्ये सुधारणा कंपनी सतत करेल व दीर्घकालीन उद्दिष्टे प्रयत्नपूर्वक साध्य केले जातील.”
अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड, जळगाव

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकल निकालाचे वैशिष्ट्ये

यावर्षी कर्ज निराकरण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर वित्त खर्चात बचत झाल्यामुळे, उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चामुळे मार्जिनवर परिणाम झाला तरी रोख नफा सुधारला.

जैन उच्च कृषि तंत्रज्ञान, टिश्युकल्चर मागणी अधिक आल्याने टिश्यू कल्चर व्यवसायामुळे वाढ दिसत आहे.

30 सप्टेंबर 2022 पर्यंत स्वतंत्र निव्वळ कर्ज – ₹ 2728 कोटी, 30 जून पासून किंचित वाढले. (रोख रकमेच्या जास्त वापरामुळे आणि दैनंदिन व्यवहारासाठी उपयोग वाढल्याने)

ऑर्डर बुक: 1785.4 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1228.6 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 556.6 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्सचा समावेश आहे.

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चा सन्मान

आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही व अर्धवर्षातील एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये

जागतिक आव्हानात्मक परिस्थितीमुळे एकत्रित महसूल लवचिक राहिला आहे.

30 सप्टेंबर 2022 पर्यंत एकत्रित सकल कर्ज ₹ 6568 कोटी आहे. 30 जून 2022 पासून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण झाल्यामुळे वाढले आहे.

ऑर्डर बुक: 3017.7 कोटी रुपये च्या एकूण ऑर्डर्स कंपनीकडे बुक आहेत ज्यामध्ये हाय-टेक अॅग्री कच्चामाल विभागाच्या 1619.2 कोटी ऑर्डरचा समावेश आहे, तर 571.5 कोटी रुपये प्लास्टिक विभागासाठी मिळालेल्या ऑर्डर्स त्याच प्रमाणे कृषि अन्न प्रक्रिया विभागातील 827.0 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com