Photo # डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले ६३ टन निर्माल्य संकलन

Photo # डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केले ६३ टन निर्माल्य संकलन

जळगाव - jalgaon

महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Foundation) रेवदंडा (Revdanda) यांचे वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी जळगाव शहरात ९४९ श्री सदस्ययांनी निर्माल्य संकलनात सहभाग नोंदविला. निर्माल्य संकलनाची सुरुवात मानाचा गणपती जळगाव महानगरपालिका येथे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी श्रीफळ वाढवून केले.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने, जळगाव शहरात ९४९ श्री सदस्ययांनी, सेंट टेरेसा, सागर पार्क, आरटीओ ऑफिस समोर, गणेश घाट, सिंधी कॉलनी रोड, इच्छा देवी चौफुली, गणेश कॉलनी, गणेश घाट, शिवाजी उद्यान, डम्पिंग ग्राउंड, नेरी नाका, मन्यारखेडा या ठिकाणीहुन प्रतिष्ठान तर्फे बूथ लावून तिथे निर्माण संकलन करण्यात आले.

गणपती विसर्जनासाठी निर्माल्यकलश उभारण्यात आले, त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व गणेशभक्त मेहरुन तलाव, तापी नदीचे पात्र, मन्यारखेडा, गिरणापात्र येथे येऊन नदीपात्रात अथवा अन्य ठिकाणी निर्माल्य टाकतात. त्यामुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होते.

याचे भविष्यातील संभाव्य धोके ओळखून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.

या एकत्रित केलेल्या निर्माल्या पासून खत निर्मिती करून प्रतिष्ठांने केलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमामार्फत लावलेल्या झाडांना वापरण्यात येणार आहे.

वैयक्तिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या निर्माल्यकलशांचा वापर करावा, असे आवाहन केले होते. पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.

गेल्या वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे शिवाजी उद्यान येथे अशाप्रकारे उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी दीड, पाच, सात व अकरा दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य जमा करून ते एका खड्यात पुरण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com