जळगाव जिल्ह्यात आहे वारंवार स्थलांतर करणारे बसस्थानक....

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड : सहन करावा लागतोय नाहक त्रास : कायमचा मार्ग काढण्याची गरज : महामंडळाचे आर्थिक नुकसान
जळगाव जिल्ह्यात आहे वारंवार स्थलांतर करणारे बसस्थानक....

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

शहरात गणेशोत्सव, दुर्गोत्सव विसर्जन (Ganeshotsav, Durgotsav Visarjan) तसेच विविध मिरवणुकांचे (various processions) आयोजन शहरातील प्रमुख मार्गावरुन होते. याच मार्गावर भुसावळ बसस्थानक (Bhusawal Bus Stand) असल्यामुळे वाहतुकीची कोंडी (traffic jam) टाळण्यासाठी शहरातील बसस्थानक अन्यत्र हलविण्यात (Bus stand shifted elsewhere) येते. त्यामुळे प्रवाशांना (Passengers) नाहक आर्थिक भुर्दंड (Financial crisis) सहन करावा लागत आहे. नेहमीच येणारी ही अडचण कायमची दूर करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात शहरात विविध सण उत्सवांत मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुकांच्या काळात वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुक मिरवणुकांच्या काळात बंद ठेवण्यात येते. येथील जामनेर रोड शहरातील मुख्य बाजारपेठ सह दवाखाने, व्यवसायिकांचे प्रतिष्ठाणे असेला रस्ता असल्याने नागरिकांना याच रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. अशा काळात नागरिकांची गैरसोय होते.

आगारात भरते बसस्थानक-

वाहतुकीची कोंडी लक्षात घेता शहरातील बसस्थानक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भरविण्यात येत होते. मात्र सदरच्या मैदान खेळासाठी आरक्षित करण्यात आले असून. व्यवसायिक कारणांसाठी ते भाड्याने न देण्याचा ठराव पालिकेने केला असल्यामुळे ते ठिकाण बसस्थानक भरविण्यासाठी बंद झाले आहे. त्यामुळे मागील काही काळांपासून अशा वेळी बसस्थानक वरणगाव रोडवर असलेल्या एस.टी. आगारात भरविण्यात येते. मात्र ते ठिकाण प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.

एसटीची जागा उपयोगाविनाच-

शहरातील नाहाटा महाविद्यालयासमोर महामार्गावर एस.टी. महामंडळाची जागा आहे. ती सर्वच दृष्टीने सोयीची व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चांगली जागा असतांनाही महामंडळाकडून या जागेचा वापर होतांना दिसत नाही. अनेक वर्षांपासून ती जागा उपयोगाविनाच पडून आहे. त्यामुळे सदरची जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.

मिरवणूकांच्या वेळी बसस्थानक होते स्थलांतरीत

याबाबत बाहेरगावाहून येणार्‍या बहुतांश प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करुन बस स्थानक ते स्थलांतरीत बसस्थानक गाठावे लागते. त्यामुळे मनस्थापही होतो. शिवाय अनेक प्रवाशी स्थलांतरीत ठिकाणी जाण्याऐवजी खाजगी वाहतुकीचे आपला पुढचा प्रवास करणे सोयीचे समजत असल्यामुळे अशा वेळी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ही होत आहे.

प्रवाशांची गैरसोय

बसस्थानक स्थलांतरीत होत असलेल्या ठिकाणांवर प्रवाशांसाठी पाणी, खाद्य पदार्थांची व्यवस्था नसते.तसेच बसण्यासाठी जागा नसल्यामुळे प्रवाशांना पुढची गाडी मिळेपर्यंत तात्कळत उभे रहावे लातग आहे.

एसटीच्या जागेचे झाले होते उद्घाटन

शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील महार्गावरील एस.टी महामंडळाच्या जागेवरुन काही गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आ. संजय सावकारे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन उद्घाटनही झाले होते. मात्र आगाराकडून तेथून बस सेवा सुरु करण्यात आली नव्हती. त्यानंतरचा बराच काळ कोरोना संसर्गात निघुन गेल्याने बसस्थानकाच्या या जागेचा प्रस्ताव सध्यातरी बारगळला आहे. दरम्यान, आ. सावकारे यांनी याबाबत आगामी काळात पाठपुराव करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com