
जळगाव - Jalgaon :
शहरातील शनिपेठेतील चौगुले प्लॉट भागात दोन गटात वाद होवून गोळीबाराच्या घटनेप्रकरणी बुधवारी विजय जयवंत शिंदे वय २३, राहुल अशोक शिंदे वय २२ व किशोर जयवंत शिंदे वय २० तिघे. रा. चौघुले प्लॉट या तिघा भावंडांना बुधवारी अटक करण्यात आली.
आज गुरुवारी तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, तिघांना १७ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात शिंदे गटातील विजय जयवंत शिंदे , राहुल अशोक शिंदे, किशोर जयवंत शिंदे तिघे. रा. चौघुले प्लॉट या तिघांना काल बुधवारी अटक करण्यात आली आहे.
दरम्यान यात संशयित विजय शिंदे याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यातील एका पिस्तूलातून त्याने घटनेच्या गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.