मविप्र संस्थेवरुन नूतनमध्ये राडा

कारसह महाविद्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हींची तोडफोड
मविप्र संस्थेवरुन नूतनमध्ये राडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन तत्कालीन तहसीलदारांनी केलेला आदेश जिल्हा न्यायालयाने रद्द ठरवीत 15 एप्रिलला तहसीलदारांनी सुनावनी घेण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार अ‍ॅड. विजय पाटील यांचे लहान भाऊ मनोज पाटील व त्यांचे सदस्य हे संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. दरम्यान दोघ गटातील सदस्य समोरासमोर आल्याने दोन्ही गटात राडा झाला. यातील एका गटाने या पसिरात उभी असलेली निलेश भोईटेंच्या कारचे काचा फोडीत नुकसान केले.

तत्कालीन तहसीलदारांनी मविप्रवर ताबा असण्याबाबत दोन्ही गटांना निर्णय दिला होता. भोईटे गटाचा ताबा विरोधात अ‍ॅड. विजय पाटील यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर न्यायालयाने भोईटे गटाचा ताबा असल्याचा निर्णय फेटाळून लावला. त्यामुळे मविप्रवर नरेंद्रअण्णा पाटील गटाचा ताबा असल्याचा शिक्कामोर्तब झाला.

त्या अनुशंगाने शनिवारी अ‍ॅड. विजय पाटील यांचे लहान बंधु मनोज पाटील यांच्यासह त्यांच्या गटातील काही सदस्य नुतन मराठा महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. परंतु त्यापूर्वी निलेश भोईटे हे मविप्रच्या कार्यालयात येवून काही कामानिमित्त बाहेर गेले होते.

भोईटे गटाच्या कर्मचार्‍यांना मारहाण

भोईटे हे बाहेर गेले असल्याने त्यांची कार महाविद्यालयाच्या परिसरात उभी होती. दरम्यान एका गटाकडून या कारच्या मागील काचा फोडून नुकसान करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखील तोडफोड करीत महाविद्यालयातील कर्मचारी सुनिल भोईटे, गणेश धुमाळ, गणेश निंबाळकर यांच्यासह सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पावणेदोन वर्षानंतर पुन्हा वाद उफळला

सुमारे पावने दोन वर्षानंतर संस्थेच्या वादावरुन पुन्हा एकदा दोन्ही गटात वाद उफळून आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांसह क्युआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या सदस्यांना परिसराच्या बाहेर काढले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com