मुक्ताईनगरात पिस्तुलसह एकाला अटक

मुक्ताईनगरात पिस्तुलसह एकाला अटक

जळगाव - Jalgaon :

मुक्ताईनगरातील श्रीकाॅलनीत गावठी पिस्तूल बाळगणार्या रवींद्र उर्फ माया माधवराव तायडे (रा.भोईवाडा, मुक्ताईनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अटक केली.

त्याच्याकडून हे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक फौजदार राजेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, दीपक पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी व अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे श्रावण जावरे, गोपीचंद सोनवणे व विजय कचरे यांनीही या कामी मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com