फुले मार्केटमध्ये महिलेची मंगलपोत लांबविली

फुले मार्केटमध्ये महिलेची मंगलपोत लांबविली

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील फुले मार्केट मध्ये खरेदीसाठी आलेल्या जळगाव तालुक्यातील धानवड येथील महिलेच्या गळ्यातून २० हजार रुपये किंमतीची मंगलपोत चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा भिका पाटील (वय-३४) रा. धानवड ता.जि.जळगाव ह्या आज गुरुवारी सकाळी पती भिका पुंडलिक पाटील यांच्यासोबत कपडे घेण्यासाठी आल्या होत्या. सकाळी ११ वाजता सेंट्रल फुले मार्केटमधील कपडे घेण्यासाठी दुकानात बसले. त्यावेळी दुकानात गर्दी होती.

दरम्यान कपडे घेतल्यानंतर ते जाण्यासाठी उठले असता त्यांना त्यांच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. चोरीची खात्री झाल्यावर मनिषा पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com