1500 किलो गांजांच्या जळगाव कनेक्शनबाबत चौकशी होणार

नांदेड येथील कारवाईत संशयितांमध्ये एरंडोलच्या एकाचा समावेश
1500 किलो गांजांच्या जळगाव कनेक्शनबाबत चौकशी होणार
Crime

जळगाव । Jalgaon प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यात एनसीबीने कारवाई करुन मोठया प्रमाणावर गांजा पकडला आहे. यातील संशयित दोघांपैकी ट्रक क्लिनर हा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आहे. हा गांजा एरंडोल येथे येवून याठिकाणी महाराष्ट्रात इतरत्र जाणार होता. अशी अधिकृत माहिती एनसीबीचे मुंबई येथील संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. वानखेडे यांंनी दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेनुसार जळगाव जिल्हा पोलीस दल गांजांचे नेमके जळगाव कनेक्शन काय याबाबत चौकशी करणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दै.देशदूतशी बोलतांना दिली आहे.

जळगाव जिल्हयातील एरंडोल येथे 1500 किलो गांजा मुंबईच्या एनसीबीच्या पथकाने एएनआय वृत्तसंस्थने ट्वीट केले होते. या वृत्तानंतर जिल्ह्यातील माध्यमांनी एरंडोलमध्ये 1500 किलो गांजा पकडल्याची बातमी प्रसारित केली. बातम्यानंतर जळगाव जिल्हयात एकच खळबळ उडाली. नेमकी गाजांची करवाई नांदेडमध्ये पकडल्याचे अधिकृत वृत्त व्हायरल झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने एनसीबीचे मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांचा अधिकृत प्रतिक्रिया ट्वीटरवरुन प्रसारित केली. त्यानंतर गांजांची कारवाई ही नांदेड जिल्हयातच झाल्याचे निष्पन्न झाले.

एनसीबीने पकडलेला एक संशयित एरंडोलचा

समीर वानखेडे यांनी दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेनुसार संशयित ट्रकचालक व क्लिनर या दोघांना अटक करण्यात आली असून क्लिनर हा एरंडोल तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तसेच नांदेडमध्ये पकडण्यात आलेला गांजाचा ट्रक जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात येत होता. याठिकाणाहून तो संपूर्ण महाराष्ट्र वितरीत केला जाणार असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली. त्यानुसार क्लिनर हा एरंडोल येथील असल्याने तसेच हा गांजा एरंडोल येथे येणार असल्याने त्याअनुषंगाने एनसीबीने पकडलेल्या 1500 किलो गाजांचे नेमके जळगाव कनेक्शन काय याबाबत जिल्हा पोलीस दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत कुठलीही माहिती जळगाव पोलिसांना मिळालेली नाही. मात्र चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बोलतांना सांगितले.

एनसीबीने पकडलेला गांजा आणि जळगावच्य कनेक्शनबाबत कुठलीही अधिकृत माहिती जळगाव पोलिसांकडे नाही. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या अधिकृत प्रतिक्रियेनुसार जळगावचे आणि गांजाचे नेमके कनेक्शन काय त्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक,जळगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com