श्रीराम रथोत्सवासाठी जळगाव नगरी सज्ज

रंगरंगोटीसह रथाच्या चाकाला तेलपाणी करण्याचे काम पुर्णत्वाकडे
श्रीराम रथोत्सवासाठी जळगाव नगरी सज्ज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कार्तिक प्रबोधिनी एकादशीला (Kartik Prabodhini Ekadashi) 4 नोव्हेंबर रोजी श्रीराम रथोत्सवाचे (Shriram Rathotsav) आयोजन करण्यात आले आहे. या रथोत्वाचे यंदाचे 150 वे वर्ष (150th year) असून रथोत्सवाची संपुर्ण जय्यत तयारी (Preparations for Rathotsava) करण्यात आली आहे. तसेच बुधवारी रथ घराबाहेर काढून तो स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर आज रथाच्या चाकांची दुरुस्ती करुन त्याला तेलपाणी घालण्यात आले. तसेच रथाला रंगरंगोटी करुन रात्रभर त्यावर फुलांची सजावट करुन रथोत्सवासाठी सज्ज करण्यात आला आहे.

श्रीराम मंदिर संस्थानचे पहिले गादीपती सद्गुरू अप्पामहाराज यांनी सुमारे दीडशेवर्षांपुर्वी श्रीराम रथोत्सवाला सुरुवात केली असून ही परंपरा आजतागायत कायम आहे. सुमारे दोन टनापेक्षा अधिक वजन व 24 फूट उंच असलेल्या रथाची निर्मिती त्र्यंबक रामजी मिस्तरी यांनी केली होती. कार्तीकी एकादशीला म्हणजेच दि. 4 रोजी शुक्रवारी रथोत्सवाचे आयोजन केले आहे. आठ दिवसांपासून शहरातील विविध भागात वनोत्सव सुरु असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी स्वयंसेवकांकडून चिंचेच्या लाकडापासून मोगर्‍या, लाकडी ओंडके बनवण्याचे काम सुरू होते.

अंबाडीसह ग्रीस लावून चाकांची दुरुस्ती

नेहमीप्रमणे रथाच्या चाकांची किरकोळ स्वरुपात दुरस्ती केल्यानंतर चाकांना ग्रीस व अंबाडी लावून त्याला तेलपाणी घातले जाते. जेणे करुन रथ ओढतांना स्वयंसेवकांसह रामभक्तांना अडचण निर्माण होवू नये. दुपारनंतर रथ श्रीराम मंदिर परिसरात आणून याठिकाणी त्याची रंगरंगोटी करण्यात आली.

रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती

शहरातील मुख्य मार्गावरुन रथ मार्गस्थ होत असल्याने त्यावर मोठे खड्डे पडले होते. दरम्यान, महानगर पालिका प्रशासनाकडून रथ मार्गस्थ होणार्‍या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी केली असून झाड्याच्या फांद्या देखील कापल्या आहेत. तसेच महावितरणकडून लोंबकाळणार्‍या वायरची देखील दुरुस्ती करण्यात आली आहे.

असा असेल रथोत्सवाचा मार्ग श्रीराम मंदिराचे गादीपती हभप मंगेशमहाराज जोशी यांच्या हस्ते रथाचे विधीवत पुजन झाल्यानंतर दुपारी 12 वाजता रथोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर रथ भोईटे गढी, आंबेडकर नगर, तेली चौक, रथ चौक, बोहरागल्ली, सुभाष चौक, दाणाबाजार, घाणेकर चौक, महात्मा गांधी मार्केट त्यानंतर रथ सुभाषचौकातील भवानी माता मंदिरात पानसुपारी होवून रथ सराफ बाजार, भिलपुरा चौकातील लालशाहबाबा यांच्या दर्गावर रथोत्सव समितीकडून चादर चढवून त्यानंतर रथ, बालाजी मंदिरामार्गे पुन्हा रथ चौकात रथाचा वाजतगाजत समारोप होईल.

सोंगाची मिरवणुक

रथोत्सवाला भवानी सोंग काढण्याची देखील परंपरा आहे. शहरातील विविध भागातील तरुण देवीच्या सोंगाची मिरवणुक काढीत असून हे सोंग पारंपारिक वाद्याच्या तालावर नृत्य करुन आपली मानता पुर्ण करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com