पोलीस ठाण्यासमोरच पोलिसाला त्याच्याच पोलीस काठीने बेदम मारहाण

माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, त्यांच्या मुलासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस ठाण्यासमोरच पोलिसाला त्याच्याच पोलीस काठीने बेदम मारहाण

जळगाव - Jalgaon

एवढ्या रात्री कुठे फिरताय अस विचारल्याचा राग आल्याने गस्तीवर असलेल्या (Jalgaon City Police Thane) जळगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किशोर निकुंभ या कर्मचार्‍याला त्याच्याच पोलीस काठीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यासमोरच घडली. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष शिवचरण कन्हैयालाल ढंढोरे यांच्यासह त्यांचा मुलगा व इतर अशा ९ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पोलिसाला त्याच्या काठीने पोलीस ठाण्यासमोर मारहाणीच्या या घटनेने पोलिसांचा धाक संपला की काय असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी शुक्रवार, १ ऑक्टोंबर रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास संदीप शिवचरण ढंढोरे वय ४२ व विलास मधुकरराव लोट वय ४५ दोन्ही रा. ब्राम्हणवाडी बळीरामपेठ या दोन संशयितांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने ४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com