शेतालगत उभ्या चिंचोली येथील शेतकर्‍याला ट्रकने चिरडले

उपचारा दरम्यान मृत्यु
शेतालगत उभ्या चिंचोली येथील शेतकर्‍याला ट्रकने चिरडले

जळगाव - Jalgaon :

तालुक्यातील चिंचोली गाव रस्त्यावर शेताबाहेर दुचाकीसह उभ्या असलेल्या शेतकऱ्याला राँगसाईड येणाऱ्या सुसाट ट्रकने चिरडल्याची घटना दुपारी घडली.

जखमी शेतकऱ्याला तत्काळ ग्रामस्थांनी जळगावी रुग्णालयात हलवले. उपचार सुरु असतांना संध्याकाळी शेतकर्‍याचा मृत्यु ओढवला. शिवाजी कडू पाटील( वय-६५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

जळगाव तालूक्यातील चिंचोली गावात शिवाजी कडू पाटिल (वय-६५) कुटूंबीयांसह वास्तव्यास असून शेतकरी आहेत.

आज नेहमी प्रमाणे ते, शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास शेताला लागून असलेल्या रस्त्यावर दुचाकीजवळ उभे असतांना राँगसाईडने सुसाट येणारा ट्रक (जी.जे.१८अे.यु.७५६०) वरील चालकाने दुचाकीसह शेतकऱ्याला फरफटत शेतात नेले.

यात शिवाजी पाटिल गंभीर जखमी झाल्याने तशाच अवस्थेत ट्रकवरील चालक आणि त्याचा साथीदार दोघांनी धुम ठोकली.

जखमीला ग्रामस्थांनी उपचारार्थ जळगावी हलवले. उपचार सुरु असतांना दोन-तीन तासातच त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com