जळगावात खड्ड्यामुळे एक्सल तुटल्याने धान्यांचा ट्रक उलटला

जळगावात खड्ड्यामुळे एक्सल तुटल्याने धान्यांचा ट्रक उलटला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरात खड्डेच खड्डे (Pits) झाले असून त्यामुळे वाहनधारक व रहिवाशी कमालीचे वैतागले आहे. या खड्डयामुळे रोज अपघात (Accident) होऊ लागले आहेत. शनिवारी सकाळी 9 वाजता शिवाजी नगरात मालवाहू ट्रकचे (freight trucks) चाक खड्ड्यात (In the wheel pit)गेल्याने एक्सल तुटून (Axle broken) हा ट्रक पलटी (Reversal) झाल्याची घटना घडली. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे नुकसान झाले. घटनास्थळी रहिवाशांनी नगरसेवक व मनपा प्रशासनाविषयी तीव्र संताप व रोष व्यक्त केला.

दूध फेडरेशनकडून धान्याचे पोते घेऊन येत असलेला ट्रक (क्र.एम.एच.19 झेड.5763) शिवाजी नगरात खड्डयात गेला. ट्रकमध्ये लोड असल्याने त्याचा एक्सेल तुटला व त्याच क्षणी ट्रक पलटी झाला. बाजुलाच मोठे झाड असल्याने त्यावर ट्रक कोसळला तर पुढे कार पार्किंग केलेली होती, त्याचे देखील ट्रकमुळे नुकसान झाले. काही अंतरावर दोन महिला होत्या. झाडामुळे त्या देखील यातून बचावल्या.

अपघात पाहून या महिलांना धडकी भरली. रहिवाशांनी एकत्र येऊन मनपाविषयी संताप व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून खड्डे व रस्त्यांच्या तक्रारी करीत असताना देखील त्याकडे कोणी लक्ष देत नाही.

प्रत्येक वेळी तीन महिन्यात दुरुस्त करु, नवीन रस्ता करु असे आश्वासन दिले जाते. मात्र काम होत नाही. ट्रक पलटी होण्याआधी देखील एक दुचाकीस्वार महिला याच खड्डयात कोसळली होती, तिच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतर हा ट्रक पलटी झाला. या खड्डयामुळे या भागात सातत्याने अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com