विल्हाळे येथील लकडोबा महाराजांना जलसमाधी

महाजेनकोच्या ढिसाळ कारभाराचा श्रध्दास्थानालाही फटका
विल्हाळे येथील लकडोबा महाराजांना जलसमाधी

वरणगांव फॅक्टरी - Varangaon Factory -

तालुक्यातील विल्हाळे येथील गावकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले लकडोबा महाराज Lakdoba Maharaj यांची मूर्ती महाजनकोच्या अपूर्ण कामामुळे पाण्याखाली गेल्याचे खळबळजनक वृत्त आहे. वेल्हाळे गावाजवळील नदीवर दिपनगरच्या राखेचा बंड झाल्यामुळे नदी प्रदूषित केली आहे.

या नदी लगतच गावचे श्रद्धास्थान असलेले लकडोबांचे छोटेसे स्थान होते त्या ठिकाणी महाजनको ने गावकरी यांच्या मागणीनुसार लकडोबा महाराजांचे मंदिर बांधून जीर्णोद्धार करण्याचा ठेका दोन वर्षापूर्वी जळगाव येथील श्री इंटरप्राईजेस यांना सोळा लाख रुपयात दिला होता. परंतु सदर ठेकेदाराने खोदकाम करून फक्त कॉंक्रीट टाकून केवळ दीड ते दोन लाखाचे काम केले व अपूर्ण सोडून दिले.

सदर खड्ड्यामध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत असून महाराज यांची मूर्ती पाण्याखाली जात असते, दिन दिवसात परिसरात भरपूर पाऊस झाल्याने लकडोबा महाराजांनी महाजनकोच्या ढिसाळ कारभारामुळे जलसमाधी घेतली आहे.

ग्रा.पं.ने वेळोवेळी महाजनकोला महाराजांच्या मंदीराचे काम पूर्ण झालेले नसल्याचे पत्र देऊन सुद्धा ठेकेदाराचे पूर्ण रक्कम अदा करण्यात आली.महाजनको गावकर्‍यांच्या जीविताशी खेळ तर खेळतच आहे परंतु आता गावातील श्रद्धास्थानाचे सुद्धा खेळ करीत असल्याचे गावकर्‍यांमध्ये बोलले जात आहे. तरी याबाबत महाजेनकोने चौकशी करून सदर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com