‘इंडिया ॲग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चा सन्मान

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान  यांच्या हस्ते ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्कार स्वीकारताना कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव व व्यासपीठावर मान्यवर
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्कार स्वीकारताना कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव व व्यासपीठावर मान्यवर

जळगाव - jalgaon

भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली (New Delhi) येथे देशातील सर्वात मोठे कृषी संमेलन (Agricultural), प्रदर्शन ‘अॅग्रोवर्ल्ड 2022’ (Agroworld 2022) पार पडले. त्यात अन्न प्रक्रिया श्रेणी करीता जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडला (Jain Farm Fresh Foods Limited) ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’ ने (India Agribusiness Awards) सन्मान करण्यात आला.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान  यांच्या हस्ते ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्कार स्वीकारताना कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव व व्यासपीठावर मान्यवर
‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवात विद्यापीठाला चार पदके

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ.संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.बी.के.यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आय ए आर आय मैदान, पुसा, नवी दिल्ली येथे भव्य प्रदर्शन आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले. त्यात शाश्वत शेतीचे तंत्र, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विपणन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी परिवर्तन, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व्यापार, ई-कॉमर्सद्वारे शेतकर्‍यांचे सक्षमीकरण: एफपीओची भूमिका इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे कार्य अधोरेखित करून अन्न प्रक्रिया श्रेणीमधून ‘इंडियन अॅग्रीबिझनेस अवॉर्डस् 2022’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करणारी एक नंबरची तर कांदा भाजीपाला निर्जलीकरण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडची ओळख आहे. या कंपनीचे वार्षिक जागतिक उत्पन्न 1600 ते 1800 कोटी रुपये आहे. तिचे मुख्य कार्यालय जळगाव (महाराष्ट्र) येथे आहे. मागील 5 वर्षात 80000 मे. टनांहून अधिक कांदयावर प्रक्रिया केली गेली. त्यासाठी 9 जिल्हे, 31 तालुके, 435 खेडे आणि 10000 हून अधिक शेतकऱ्यांकडून करार शेतीवर माल खरेदी करून प्रक्रिया केली.

कंपनीने दिलेल्या तंत्रामुळे शाश्वत शेती करता येते आणि शेतकऱ्यांची उपजिविका व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न यात सुधारणा झाली, ही सुधारणा सातत्याने होतच आहे.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला, उत्तम दर्जाचे बी-बियाणे, 100 हून अधिक कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देते. शेतकऱ्यांकडून ताजे कांदे उत्तम भावात खरेदी करते. अल्पभूधारक आणि मध्यम आकाराची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना भारतात जैन गॅप अंतर्गत उत्तम शेती पद्धती (Good Agriculture Practices- गॅप) हा भारतातील कृषी क्षेत्रातील पहिला उपक्रम ही कंपनी राबवते. हा उन्नती उपक्रम जे जैन फार्म फ्रेश फुडस् संयुक्तपणे शेतकऱ्यांसोबत भागीदारीत राबवते. या उपक्रमात शेतकऱ्यांना अती सघन लागवड पद्धत (Ultra High Density Plantation-युएचडीपी) शिकवली जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com