महिलांना मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; विळ्याचा धाक दाखवून दागिने लुटले

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील नव वर्षाच्या पहिल्याच पहाटची घटना
महिलांना मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; विळ्याचा धाक दाखवून दागिने लुटले

रावेर|प्रतिनिधी raver

ऐनपूर (ता.रावेर) येथे सकाळी (Morning walk) मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ४ महिलांच्या जीवावर बेतले आहे. अज्ञात चोरट्यांने महिलांना लोखंडी विळ्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने हिसकावून पोबारा केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच पहाटे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील संगिता विजय पाटील, कल्पना सुभाष पाटील, अर्चना विनोद पाटील, मिराबाई श्रीराम पाटील ह्या महिला सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी निघाल्या होत्या, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाच्या पुढे, अचानक एक भामटा शेतातून बाहेर आला, विडा दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत, माहिलांकडे असलेले मंगळसूत्र, कानातील दागिने असा एकूण ६३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून हा चोरटा केळीच्या बागेतून अंधाराचा फायदा घेत पसार झाला ही घटना दि.१ शनिवार सकाळी ५.३० वा.घडली.

या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक स्वप्नील उन्नवणे, पोहेकॉ ज्ञानेश्वर चौधरी घटनास्थळी दाखल झाले. महीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com