मीटरप्रमाणे भाडे आकारणे ऑटो रिक्षाचालकांना बंधनकारक

परिवहन अधिकार्‍यांचा इशारा
मीटरप्रमाणे भाडे आकारणे ऑटो रिक्षाचालकांना बंधनकारक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (Sub Regional Transport Office), जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतुकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व ऑटोरिक्षा चालकांना (Autorickshaw drivers) परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक (Passenger transport) करताना मीटरप्रमाणे भाडे (Rent as per meter)आकारणे बंधनकारक (Charging is mandatory) आहे. तसेच प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला मोटर वाहन नियमान्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक असून ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील (Assistant Regional Transport Officer Ganesh Patil) यांनी दिली.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. ही बाब कायदेशिर आहे. परंतु उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी 8 नोव्हेंबरपर्यंत ऑटोरिक्षा फेअरमीटर प्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटर प्रमाणे भाडे घ्यावे; अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणार्‍या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com