असेही होऊ शकते... पोलिस स्टेशनमधील सफाई कामगाराच्या मुलाकडूनच जप्त केला जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा

यावल पोलीसांची कौतुकास्पद कार्यवाही
असेही होऊ शकते... पोलिस स्टेशनमधील सफाई कामगाराच्या मुलाकडूनच जप्त केला जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा

यावल Yaval ( प्रतिनिधी )

येथे यावल पोलीस स्टेशन (Yaval Police Station) मध्ये सफाई कामगार (Sweepers) म्हणून काम करणाऱ्या सफाई कामगाराच्या जागेवर त्याचा मुलगा (Son) एक महिन्यापासून काम करत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal background) चा संशय पोलीस निरीक्षक सुधीर पाटील (Police Inspector Sudhir Patil) यांना आल्याने त्याचेवर पाळत ठेवून अखेर दोन जानेवारी 22 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास फैजपूर रोड वरील हॉटेल अंजली समोर त्याच्या कडून जिवंत काडतुस (Live cartridge) सह गावठी कट्टा, (Gawthi Katta) 2 मोबाईल व मोटारसायकल असा दिड लाखाचा ऐवज जप्त (Confiscated) केला . या कारवाईमुळे यावल सह तालुक्यात यावलं पोलिसांचे (Yaval police) कौतुक होत आहे

यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की यावल पोलीस स्टेशन मध्ये युवराज घारू हे कधीपासून सफाई चे काम करीत होते सुमारे एक दीड महिन्यापासून युवराजचे जागेवर त्यांचा मुलगा सुमित युवराज घारू (वय 21 )रा .श्रीराम नगर यावल हा काम करत होता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे नजर ठेवून होते.

त्याची पार्श्वभूमी तपासली तो संशय तरी त्या गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे त्यांना दिसून आले दिनांक 28 जानेवारी 22 रविवार रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास विजपुर रोड वरील हॉटेल अंजली समोर तो मोटर सायकल जवळ संशयित रित्या आढळून आला त्याला ताब्यात घेतले असता त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्याचेकडून एक जिवंत काडतूस व गावठी कट्टा आणि दोन मोबाईल तसेच मोटार सायकल नंबर MH19- DP - 18 75 ही गाडी यावल पोलिसांनी हस्तगत केली असून हा सर्व माल दीड लाखाचा पंचनामा यामध्ये नमूद करण्यात आला आहे याबाबत यावल पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अर्मा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदर गुन्ह्यातील मोटारसायकल सुद्धा संशयित रित्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून ती चोरीची आहे किंवा काय? व आणखी काही गुन्हे उघडकीस येतात काय ?हा तपास आता नेमका पुढे काय वळण घेते? याकडे लक्ष लागून असून या कारवाईमध्ये यावल पोलीस निरीक्षक स्वतः सुधीर पाटील सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, नेताजी वंजारी, असलम खान, गोहिल रमेश, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, यांच्यासह आदींनी कारवाईमध्ये सहभाग घेतला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com