क्रूझरच्या धडकेने निंबोलच्या इसमाचा मृत्यू

जुना बोर्हडे गावाजवळ घडली घटना
क्रूझरच्या धडकेने निंबोलच्या इसमाचा मृत्यू

रावेर Raver|प्रतिनिधी

निंबोल (Nimbol) येथे क्रूझर (cruiser) गाडीने मागून धडक (hit) दिल्याने झालेल्या अपघातात (accident) दुचाकीस्वाराचा (Two-wheeler) जागीच मृत्यू (killed) झाल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत रावेर पोलिसात (police) गुन्हा (Crime i) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,निंबोल येथील राजाराम धनु धनगर हे नातेवाईकांच्या तेराव्यासाठी जात असताना,जुना बोर्हडे गावाच्या वळणार क्रूझर गाडी क्र. एमएच ०८ सी ७१३३ या गाडी चालकाने मागून धडक दिल्याने या अपघातात मोटार सायकल क्र. एमएच १९ सी इ ९३४२ चे नुकसान होऊन राजाराम धनगर यांचा जागीच मृत्यू झाला

याबाबत भगवान चिकटे(धनगर) यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक कैलास नागरे उपनिरीक्षक सचिन नवले करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com